सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
पळाशीतांडा ता.सोयगाव येथे कर्जाच्या ओझ्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना पळाशीतांडा ता.सोयगाव येथे उघडकीस आली आहे.या शेतकऱ्याला तातडीने उपचारासाठी पाचोरा जि.जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी पाचोरा जि.जळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृतुयची नोंद करण्यात आली आहे.
पळाशीतांडा ता.सोयगाव येथील अल्पभूधारक शेतकरी रघुनाथ मखराम चव्हाण(वय ४०)याने कर्जाच्या ओझ्याखाली तणावात असल्याने शेतातच विषारी औषध प्राशन केले त्याला तातडीने उपचारासाठी पाचोरा जि.जळगावला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते,परंतु अखेरीस त्याची प्राणज्योत मावळली.त्याचेकडे सेवासंस्थेचे,खासगी फायनांस आणि मायक्रो फायनांस असे एकूण दोन लाखाच्या जवळपास कर्ज रक्कम थकबाकी होती त्या रक्कमेची परत फेडण्याच्या चिंतेत त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.या प्रकरणी अद्याप महसूल प्रशासनाचा पंचनामा करण्यात आलेला नव्हता,पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.