ब्रेकिंग न्युज

भारतीय कम्युनिस्ट पक्ष ,शेकापच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपनी मिळाली; खासदार ,पालकमंत्री व आमदारांचे आभार

पाटोदा दि.११:शेख महेशर गेल्या आठ दिवसापुर्वी बीड जिल्हा पंतप्रधान विमा योजनेतून वगळला होता . विशेष म्हणजे महाराष्ट्रातुन बीड जिल्हयाला पिकविम्या पासुन जाणीवपूर्वक वगळण्यात आले होते. परंतु भाकप व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सातत्याने आठ दिवसापासुन पाठलाग करून शेवटी १३ जुलै २०२० पाटोदा उपविभागीय कार्यालयावर तिव्र अशा निदर्शनाचे निवेदन दिनांक ०८ जुलै २०२० रोजी दिलेले होते. एवढेच नाही तर सातत्याने प्रसार माध्यमाशी संपर्क ठेवुन बातम्या व पालकमंञी, खासदार व आमदार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला.दुसरे विशेष म्हणजे बीड जिल्हा पंतप्रधान पिक विमा योजनेतुने का वगळण्यात आला होता त्याचे विशेष कारण म्हणजे जिल्हयातील बोगसगिरीमुळे विमा कंपनी विमा भरुन घेण्यास तयार होत नव्हत्या. आता तरी अंग्रीकल्चर इन्सुरन्स विमा कंपनी अशा बोगसगिरी करणाऱ्या लोकापासुन सावध राहुन कारभार करावा नसता बोगसगिरी करणाऱ्या लोकापासुन, गरीब सर्व सामान्य शेतकऱ्याचा जिव टांकणीला लागु नये अशा प्रकारे सन २०१९ च्या रब्बी पिक विम्यापासुन पाटोदा तालुका वगळण्यात आला होता. दुसरी गोष्ट अशी अजुन ही पाटोदा तालुक्यातील शेतकरी सन २०१९ च्या खरीप पिक कांदा, कापुस, तुर, इतर पिकापासुन वंचीत राहिलेला असुन त्या वर येत्या काळात भाकप व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडणार आहोत. याची शासनाने जाणीवपुर्वक दखल घ्या. विशेष म्हणजे भाकप शेकापच्या वतीने तिव्र आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे व बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांनी विशेष लक्ष घालुन पाठपुरावा केल्यामुळे बीड जिल्हा पिक विमा भरुन घेण्यास अॅग्रीकल्चर इंन्शुरन्स कंपनी मिळवून दिली . त्याबद्दल आम्ही मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब यांना धन्यवाद देऊन आभार मानतो. त्याच बरोबर बीड जिल्हयाच्या खासदार, व आणि जिल्हयातील आमदार यांनी जिल्हयाला विमा कंपनी मिळवून दिली. असे प्रसिध्दी पत्रक महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष कॉम्रेड महादेव नागरगोजे, व शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी दिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button