अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणविशेष बातमी

शेतकरी,गायरानधारक व इनामी जमिन वाहितीदार यांना सरसकट मदत करा- अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यातील शेतकरी, गायरानधारक,इनामी जमीन वहितीदार यांच्या जमिनीचे पंचनामे करुन संबंधित शेतकरी यांना सरसगट हेक्टरी रू.30,000/- नुकसान भरपाई व पिक विमा रक्कम अदा करावी त्याचप्रमाणे त्यांचे घटक शेतमजुर,घरमजुर,बांधकाम मजुर आणि ऊसतोड कामगार यांना प्रत्येकी रू.10,000 रूपये मदत करावी.मदत तात्काळ न दिल्यास पुढील आठ दिवसांत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीने राज्य सरकारला उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत बुधवार,दि.29 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहु बनसोडे यांनी उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील परतीच्या पावसाने शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झालेले शेतकरी,गायरानधारक, इनामी जमिन वहितीदार यांच्या जमिनीचे पंचनामे करुन संबंधित शेतकरी यांना विनाअट हेक्टरी रू.30,000/- नुकसान भरपाई व त्यांचे घटक शेतमजूर, घरमजूर,बांधकाम मजूर, ऊसतोड कामगार ज्यांना उपजिविकेचे कुठल्याही प्रकारचे साधन नसलेल्यांना प्रत्येकी रु.10,000/- मदत करावी.आपण आमच्या मागण्या तात्काळ न दिल्यामुळे आम्ही आठ दिवसांत आमरण उपोषणास बसणार आहोत.तरी याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार करुन आमच्या मागण्या मान्य कराव्या असे म्हटले आहे.निवेदनावर लहु बनसोडे, विठ्ठल झाडे,अक्षय घोडके, ए.डी.गालफाडे, शिवाजी राऊत, एस.आर.सातपुते,विनोद गालफाडे, एम.एन.राऊत,अजय थोरात,विशाल कसबे,संतोष मुळे,व्ही.के.पवार,सचिन गायकवाड,बंटी गायकवाड, प्रकाश गालफाडे, ऋषी गालफाडे,सुरेश गालफाडे, विनोद गालफाडे,योगेश बरडे, युसुफ पठाण,उत्तम पाचपिंडे, आर.डी.सरवदे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Back to top button