बीड:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे चौसाळा येथिल निजामकालीन विश्रामगृह अत्यंत दुरावस्थेत असुन जुगारी आणि दारुड्यांचा अड्डा बनले असून शासकीय कर्मचारी यांच्या कामचुकार पणामुळे घाणीचा विळखा पडला आहे, प्रशासनाने विश्रामगृहाची दूरूस्ती व देखभाल करावी अशी लेखी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
विवेक कुचेकर , सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहूजण आघाडी नेते–
बीड तालुक्यातील मौजे चौसाळा जुना राष्ट्रीय महामार्ग २११ लगत असणारे, अंदाजे १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात असलेले विश्रामगृह केवळ शोभेची वस्तू म्हणून राहिले आहे, दारूच्या बाटल्या, पत्ते खेळणे, सभोवताली घाणीचे साम्राज्य , तसेच या ठिकाणी शासन नियुक्त कर्मचारी साफसफाई आदि.सेवा नियमित देत नाही,त्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, दुरुस्ती करावी, अन्यथा वंचित बहूजण आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर–
शासन नियुक्त कर्मचारी लक्ष देत नसल्यामुळे अस्वछता आहे, जुने निजामकालीन विश्रामगृह आज मोडकळीस आले आहे.१०-१२ वर्षांपूर्वी विश्रामगृहाच्या दुरूस्तीसाठी आलेला निधी थातुरमातुर काम करत स्थानिक नेत्यांच्या बगलबच्चांनी हडप केला. सध्या विश्रामगृह पार्किंग झोन बनले असुन आवारात चारचाकी वाहने लावलेली दिसुन येतात. विश्रामगृह हे जुगारी आणि दारुड्यांचा अड्डा बनले असुन आवारात दारूच्या बाटल्या आणि पत्त्यांचा खच पडलेला दिसुन येतो तर भिंतीचा वापर लघुशंकेसाठी करण्यात येत आहे, आजुबाजूनी घाणीचे साम्राज्य पसरले आहे,या निजामकालीन वास्तुचे जतन करण्यात यावे, शासन नियुक्त कर्मचारी यांनी नियमित साफसफाई करावी, व जिल्हा प्रशासनाने विश्रामगृहाची दूरूस्ती करावी अशी लेखी मागणी जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे.