अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांची विधानपरिषदेवर निवड करा अशी मागणी अनु.जाती आश्रम शाळा अनुदान संघर्ष समितीचे अध्यक्ष लहू बनसोडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल,मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते यांचेसह इतरांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात केली आहे.महाराष्ट्र राज्यात अनु.जाती आश्रम शाळा अनुदान संघर्ष समिती ही प्रमुख मार्गदर्शक व सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच अध्यक्ष लहू बनसोडे,कामगार नेते रमेश जाधव,सरचिटणीस राजेंद्र सदावर्ते,प्रमुख संघटक संदिप वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली काम करते.या संघटनेच्या वतीने रविवार,दिनांक 12 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय,मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महसुलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्यपाल नियुक्त आमदार म्हणुन निवड करण्यात यावी. कारण,पञकारीता क्षेत्रात एस.एम.देशमुख यांनी मागील तीस वर्षांपासुन विविध दैनिकातूंन महत्वाची जबाबदारी पार पाडली.तसेच
पत्रकारांच्या विविध अडचणी समजुन घेऊन त्या संदर्भात लढा दिला.त्यांच्या लढ्यामुळे पत्रकार
संरक्षण कायदा,जेष्ठ पत्रकारांना पेन्शन,पत्रकार हल्ला विरोधी समितीची स्थापना तसेच
पत्रकारांना प्रेरणा मिळावी या अनुषंगाने पहिले मराठी वृत्तपत्र काढणारे बाळशास्त्री जांभेकर यांचे भव्यदिव्य स्मारक आणि सामाजिक भावनेतुन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी विशेष प्रयत्न करून तो प्रश्न मार्गी लावला.त्यांना समाजात सामाजिक प्रश्नांचा अभ्यास आहे.गाढे अभ्यासक म्हणुन सामाजिक भान आहे.म्हणुन आपल्या महाराष्ट्राला प्रसारमाध्यम चळवळीतून विकासाची दिशा देणा-या अशा
विचारवंताची गरज आहे.त्यांनी यापुर्वीही असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पत्रकारांचे हित जपण्यासाठी अनेक वेळा उपोषण,आंदोलन,मोर्चे काढुन पत्रकारांना न्याय मिळवुन देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे.भारतीय घटनेच्या तरतुदी नुसार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणा-या पत्रकार बांधवांना ही विधान परिषदेवर स्थान मिळणे आवश्यक आहे.तरी एस.एम.देशमुख यांना विधान परिषेदवर घ्यावे अशी विनंती ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात लहू बनसोडे यांनी केली आहे.