औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसामाजिकसोयगाव तालुका

अवघ्या २४ तासातच आरोग्य उपकेंद्र रुग्णांच्या सेवेत ,प्रशासन आणि मराठा प्रतिष्ठानचा पुढाकार

सोयगाव,दि.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
आठ वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेले घोसला ता.सोयगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचा अवघ्या २४ तासात प्रशासन आणि मराठा प्रतिष्ठानच्या व ग्रामस्थांच्या पुढाकाराने कायापालट झाल्याने रविवारी सायंकाळ पासून घोसल्याचे आरोग्य उपकेंद्र रुग्णांच्या सेवेत झाले आहे.शनिवारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी आणि रविवारी मराठा प्रतिष्ठानचे श्रमदान यामुळे दुर्गंधीत असलेली आरोग्य केंद्राची इमारत उजळली आहे.
घोसला ता.सोयगाव येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत आठ वर्षापासून अपूर्ण अवस्थेत धूळखात पडून होती.या इमारतीचा संबंधित ठेकेदाराने आरोग्य विभागाला ताबा दिलेला नव्हता आणि आरोग्य विभागाने अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे इमारतीचा ताबा घेतला नसल्याने या दोघांच्या वादात कोट्यावधी रुपयाची इमारत दुर्गंधीत पडून होती.मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तहसीलदार यांना भेटून याबाबत चर्चा करून इमारतीला उजाळा देण्याची मागणी केली होती.यामुळे तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी संयुक्त पाहणी करून इमारतीचा ताबा घेतला आणि तातडीने घोसला आरोग्य उपकेंद्रासाठी रविवारी सहा बेड पाठवून उपकेंद्र चालू केले आहे.मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी स्वतः या ठिकाणी श्रमदान करून ग्रामस्थांच्या मदतीने इमारत परिसर स्वच्छ केला.इमारतीच्या स्वच्छतेसाठी टॅकरने पाणी आणून मराठा प्रतिष्ठानने या इमारतीची स्वच्छता करून प्रशासनाने पुरविलेले बेड अंथरून उपकेंद्र उभारले असल्याने आता घोसलासह पाच गावातील नागरिकांना रविवार पासून आरोग्यसेवा मिळणार आहे.

ग्रामस्थांचे श्रमदान-

मराठा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष इमारतीच्या भवताली असलेली दुर्गंधी दूर करून परिसर स्वच्छ केला होता.ज्ञानेश्वर युवरे,सोपान गव्हांडे,ज्ञानेश्वर वाघ,गणेश गवळी आदींनी याकामी पुढाकार घेतला होता.

मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी स्वतः इमारतीच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याने अवघ्या २४ तासातच आरोग्य उपकेंद्र रुग्णांच्या सेवेसाठी उभे राहिले आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.