जरंडी,ता.१२:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा वाढता आकडेवारी पाहून नियंत्रित असलेल्या सोयगाव तालुक्याला हादरा बसला आहे.त्यामुळे रविवारीही महसूल,पंचायत आणि आरोग्य विभागाचे अधिकारी रस्त्यावर गावागावात आढळून नागरिकांशी संवाद साधत असल्याचे चित्र होते.
जरंडी परिसरात अचानक अधिकारी रविवारीही गावागावात फिरकू लागल्याने ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.तहसीलदार प्रवीण पांडे यांनी जरंडी,निंबायती,घोसला,आदी गावांना भेटी देवून नागरीकांसी संवाद साधला कोविड केंद्रांना भेटी देवून त्या ठिकाणच्या गैरसोयी दूर केल्या तर गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनीही तालुक्यातील घोसला,जरंडी,निंबायती,पहुरी या गावांचा दौरा करून त्या ठिकाणचा आढावा घेतला तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनीही तालुक्याचा दौरा करून आरोग्य तपासण्यांची पाहणी करून आढावा घेतला काही भागात तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तपे यांनी नागरिकांच्या भेटी घेवून विचारपूस केली आहे.
निंबायतीच्या कोविड केंद्रावर दोघी अधिकाऱ्यांचा तळ-
निंबायती ता.सोयगाव येथील उभारण्यात आलेल्या नवीन कोविड केंद्रावर तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,नायब तहसीलदार मकसूद शेख आदींनी तब्बल तीन तास ठिय्या मांडून त्या भागातील कोविड केंद्राच्या समस्या दूर केल्या होत्या,तसेच जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड केंद्राची पाहणीही केली होती.अधिकारी आणि कर्मचारी सुटीच्या दिवशीही रस्त्यावर आढळून आल्याने नागरिकांना आश्चर्य वाटत होते.