पाटोदा:गणेश शेवाळे― शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या तीघाडी सरकारच्या विरोधात संबळ आंदोलन आज दि.१३ जुलै रोजी सकाळी ११ वा. राष्ट्रीयकृत बँका, कृषी व महसूल विभाग कार्यालयांबाहेर मागेल त्या शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यासाठी राजगृहावर भ्याड हल्ला करणाऱ्या नराधमांच्या अटकेसाठी,निकृष्ट दर्जाचे बियाने पुरवणाऱ्या कंपन्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या कृषी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी, शेतकऱ्यांना बांधावर खते पुरवू असे सांगणाऱ्या सरकारने दुकानात तरी योग्य भावात खते उपलब्ध करून द्यावी यासाठी,खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी यासाठी,गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी अतिवृष्टीतील फळबागांची हेक्टरी 18000 नुकसान भरपाई तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी,मराठा आरक्षणाच्या सुनावणी मध्ये शासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणा विरोधात व शासनाने मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडावी यासाठी संबळ आंदोलन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुनच अांदोलनात सहभागी व्हावे
असे आवाहन पाटोदा प्रथम नगराध्यक्ष यांचे पती बळीराम पोटे यांनी केले आहे.