अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहिला विशेषसामाजिक

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी अंजली चरखा तर सचिवपदी मेघना मोहिते यांची निवड

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी अंजली प्रमोद चरखा तर सचिवपदी मेघना संतोष मोहिते यांची निवड करण्यात आली.पदग्रहण संदर्भात रविवार,दिनांक 12 जुलै रोजी अंबाजोगाईत इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा.अरूंधती पाटील,नुतन अध्यक्ष अंजली चरखा,नुतन सचिव मेघना मोहीते,माजी अध्यक्ष सुहासिनी मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.तर शिवकन्या पवार,रेखा शितोळे,गिता परदेशी,अनिता फड,धनश्री भानप,सुनिता कात्रेला,मिना डागा,किरण देशमुख या उपस्थित होत्या.याप्रसंगी बोलताना प्रा.अरूंधती पाटील म्हणाल्या की,श्रीमंत कुटुंबातील महीलांनी समाजातील गरजू,मजूर,कष्टकरी व श्रमजिवी महीलांचा विचार करून त्यांना काही मदत करता आली तर करावी.तसेच कोरोना (कोवीड) च्या काळात आजारी रूग्ण महिलांना मानसिक बळ देण्याचे काम इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईने करावे असे आवाहन करून इनरव्हीलच्या समाजउपयोगी कामाचे कौतुक केले.मान्यवरांचे उपस्थितीत सुञ हस्तांतरण होवून वृक्षारोपण करण्यात आले.इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वर्ष 2020-2021 साठीच्या नुतन कार्यकारिणीत अंजली प्रमोद चरखा(अध्यक्ष),मेघना संतोष मोहिते(सचिव),वैजयंती टाकळकर (उपाध्यक्ष),अर्चना मुंदडा(आय.एस.ओ),शिवकन्या पवार (कोषाध्यक्ष),सुनीता कात्रेला (एडिटर),धनश्री भानप(सहसचिव) यांचा समावेश आहे.इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या नुतन कार्यकारिणीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.