पाकिस्तान विरोधी घोषणाबाजीने परीसर दणाणले
पाटोदा (शेख महेशर) जम्मु काश्मीर मधील पुलवामा जवळील अवंतीपुरा या गावाजवळ सैन्याचा दारुगोळा घेवून जाणाऱ्या सैन्यांच्या तुकडीवर जैश -ए- महंमद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात जवानांनी देशासाठी सर्वोच बलिदान दिले, या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात पाटोद्यात शुक्रवारी (जुमा नमाज) नंतर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करीत. पाकिस्तानला तात्काळ धडा शिकवा अशा संतप्त भावना व्यक्त करीत, हजरत राज महमंद चौक येथे पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला , या वेळी शहरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. सतंप्त नागरीकांनी, पाकिस्तान मुर्दाबाद,पाकिस्तानला धडा शिकवा, " हिन्दुस्थान जिन्दाबाद " शहिद जवान अमर रहे च्या प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणुन सोडला, या वेळी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला व आता पाकिस्तानला थेट पणे धडा शिकवलाच पाहीजे अशी एकमुखी मागणी करण्यात आली, त्याच प्रमाणे शहीद जवाना प्रती आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी नय्युम भाई पठाण, सय्यद अब्दुला अॅड.जब्बार पठाण, असिफ सौदागर, उमर चाऊस, शेख असिफ, यहीयाभाई चाऊस, शेख इम्रान नुर, सय्यद शप्पु शेठ, शेख सबदर मामु, शेख फय्युम भाई, शेख शहानवाज, पठाण इकलास, शेख वसीम, शेख जावेद, शेख जमील, शेख जुनेद, शेख जव्वाद, शेख इलीयास, शेख महेशर, सय्यद मुबीन, शेख बासेद, शेख असीर, शेख इरफान, इत्यादी सह मुस्लिम बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.