औरंगाबाद जिल्हालेख

...मानसिक ताण आणि व्यसनांचे वाढते प्रमाण

प्रा.संजय काळे /औरंगाबाद
माणसाच्या आयुष्यातील अनेक अङचणी असतात त्याला कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे हा उपाय असू शकत नाहीत ,माञ अनेक जण ताणतणावात आपल्याला व्यसन करतांना दिसत आहेत .
माणूस जीवन जगतांना अनेक समस्यांचा सामना करीत असतो.त्यात सुख आणि दुःखाचा समावेश असतो.परंतु अतिशयोक्तीपणाने निराशेचे प्रमाण जर वाढले तर माणूस व्यसन करतो, असे अनेकदा आपल्याला बघायला मिळते माञ, तो पर्याय नाही .
भारतीय राज्य घटनेच्या अनूसार आपण आपल्या देशात स्वातंत्र्य अनुभवतो.फक्त ठराविक तारखेला आणि दिनाला,...पण जर खरं सामाजिक आणि नैतिक स्वातंत्र्याच्या रूपात अनुभव घेण्यासाठी शासनाच्या मनात व्यसनधिनता रोखता आली पाहिजे तरच भल .......
मानवाला जीवनावश्यक गरजा मिळवून घेण्यासाठी राबराब मरमर करावी लागते. मानवी जीवनातील मुख्य बाबींचा विचार करत असतानाच अन्न, वस्त्र आणि निवारा या करीता सतत धङपङ करावी लागते आहे.
मानवी जीवनाची एकंदर स्थितीचाआढावा घेतला आर्थिक नियोजनबद्धता योग्यपणे न असल्याने अनेक ताणतणाव उद्भवत आहेत. जसे- लहानपणी असणाऱ्या सवयी, मिञाची संगत सोबत गुण,सामाजिक जबजबाबदारी विसर, सुशिक्षित आणि सुशिक्षित बेरोजगारी, कौटुंबिक हिंसाचार, मानसिक तणाव, मानवी जीवनात न आधारपण, जीवनावश्यक वस्तूंच्या करीता असलेली धङपङ, सामाजिक आणि सांस्कृतिकता यांच्या संबंधित नसलेली जाणीव, वाममार्गाला लागलेल्या फळीत कायम असलेली वागणूक आदी सवयीमुळे माणसाला व्यसनाधीनता आपल्या जीवनाचा एक भाग वाटतो आणि अशा व्यसनाच्या विळख्यात सापडलेले मानवाला मुक्त करण्यासाठी
भारतीय केंद्रीय नियोजन व्यवस्था (कायदेशीरपणे) राज्य शासन याच्या एकमूखीपणाने अमलबजावणी जर करता आली तर व्यसनधारकांस आपल्याला सहज रोखता येईलच, दुर्दैवाने आपल्याला हे धोरण बजावता येणे काळाची गरज आहे. परंतु याकाळापासून सगळ्यांना फायदा होईल असे कुणालाही काहीही वाटत नाही. पर्यायाने देशातील आणि राज्यातील लोकसंख्येचा आढावा घेऊन जर विचारविनिमय केला तर अनेक कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती अगदी सहजपणे सुधारणा करता येऊ शकेल परंतु इथे काहीही संबंध नाही अशा प्रकारे 'व्यसन' करणार्‍याकङे बघितले जात आहे .
भारतीय लोकशाहीचा एक भाग म्हणून जनमत घेऊन लोक अनेक राज्याच्या विविध ठिकाणी व्यवस्था चालविण्यात यशाचे पाढे वाचताना दिसतात, माञ व्यसन मुक्तीसाठी शासकीय धोरणाची भूमिका कुणीही ठामपणे मांडत नाही हे आपल्या मान्य करावे लागते. व्यसन असणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराचा विचार केला तर व्यसनधारकांमुळे त्याच्या कुटुंबीयांना जीवनात सतत दुखापतीला सामोरे जावे लागते आहे. म्हणून व्यसन मुक्तीकरीता शासकीय धोरणाची भूमिका ठामपणे राबली गेली पाहिजे पण ते आपल्याला साध्य करता येत नाही.माणूस हा समाजशील प्राणी आहे .माणूस आपल्या स्वतःच्या विकासासाठी सतत आणि सतत धङपङत असतो.
माणूस जन्माला येण्यापूर्वी पासून ते आयुष्याच्या अखेरीस सतत सुख आणि दुःखाचे अनेक संगम रंगविताना मनाच्या पटलावर जो आलेख तयार होतो.तोच खरयां अर्थाने मनोविकारांची ती अल्पकालीन जन्मवस्या असते.वयाची टप्प्यावर जसे जसे अनुभव येत जातात तसे तसे मनोविकार आकार घेऊ पाहते अन् कालांतराने मनोविकार रोखून ठेवण्यासाठी माणूस एका वेगवेगळ्या वळणावर येती.मगच व्यसनाला सुरूवात होते.
उदा- ङोक जङ होऊ लागते , चक्कर येतात ,ङोळयासमोर अंधाऱ्या येतात, फिरायला सारखे वाटते, पोटात तोङल्या वाणी वाटतय, मळमळ लागते , भयभीत वाटते , अशा अनेक मानसिक आजारपण घालविणे हा माणसाच्या मनात असताना मग सुरूवातीला चहा पिणे, चहाच्या नंतर गोङपणा घालविण्यासाठी सोफ खिणे,सोफ्यावर न भागता सुपारी खाणे, सुपारीत मिऋ युक्त पदार्थ खाणे,नंतर गुटखा खाणे, मावा खाणे, बार खाणे, सुपारीचे पदार्थाच्या कंटाळून जावून तंबाखू जन्य पदार्थाचे सेवन करणे, सिगारेट , बिङी, दारू, चरस, गाजा, आफीम, चिलम, हुकका यांच्यातील अतिसेवनाने मनोविकार इतका वाढतो की, तो व्यसनाचा एक भाग बनून जातो.आयुष्य हे सुखाचा आणि दुःखाचा सुरेल संगम आहे .आयुष्यातील अनेकविध टप्प्यावर जीवन रेखांकन केलेले आहे .मानशास्त्रीय दृष्टिकोनातून बाल्यवस्या, किशोरवस्या, तारूण्यवस्या, वृद्धावस्या या प्रमुख चार टप्प्यात एकदंर जीवन अवलंबून आहे .
आपल्या देशाच्या एका नामवंत विचारवंताने एका ठिकाणी म्हटले आहे,' उच्च राहणीमान आणि विचार' माञ, त्या विचारवंतांनी युवकांचयां आयुष्यातील मोलाची कामगिरीवर देश महासत्ता होण्यास मदत होईल, असा उद्दात हेतू त्यामागे होता. जगण्यावर प्रत्येकाने प्रेम करणे आवश्यक आहे .एकविसावे शतक हे वैज्ञानिक युग आहे .
यात जगत असताना आपल्याकडे वेगवेगळ्या विचार,आचार,संचार, प्रचार,करणारी मंडळी आहे .आपल्या राष्ट्रांच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर युवाशक्ती ही सगळ्यात मोठी संपती आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही .परंतु जीवनातील अनेकविध टप्प्यावर आपल्याला मिळणाऱ्या संबंधातील रूपांतर हे व्यसनात घट्ट केले जाते.
या व्यसनाचयां रूपांतर हे हाय प्रोफाईल जगणं जीवनाचा एक भाग होऊन बसलेला आहे .
उदा-शाळा ,काँलेज,महाविद्यालय,उच्च महाविद्यालय, विदयापीठ, शासकीय कार्यालय, छोट्या - मोठ्या सामाजिक संघटना,कामगार संघटना,हातगाडी कामगार संघटना,विट भटटी कामगार संघटना, मिस्ञी,पेंटरांचे समूह, रिक्षा चालक समूह,छोटे वाहन धारक समूह,बाल कामगार संघटना, राजकीय कृत संघटना,अनेक मिञ मंङळ, वेगवेगळे क्लब, गरीबीची झळ सहन न करू पाहणाऱ्या वस्तयां,झोपङपटटी समूह, बेकारीत पङणारे गट,
अशासारख्या माध्यमातून आपल्याला व्यसनाचे जाळे विणलेले दिसत आहेत .
विश्व आरोग्य संघटनेच्या माध्यमातून असे लक्षात येते.आजच्या युवा शक्तीच्या बाबतीत अनेक व्यसन असल्याने मृत्यूदरातही वाढ झालेल्याचे समजते आहे. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्यावरती परत फोन करू नका , कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्याअगोदर परत करा , तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत.एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका , शक्य असल्यास देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा.तुझ अजून लग्न झालं नाही ... तू अजून घर बांधलं नाहीस ..असले समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका कारण ती तुमची अडचण नाही. नेहमी आपल्यापाठुन येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुमचा कमीपणा होत . तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याच भाडे त्याने दिले तर पुढच्या वेळेस तुम्ही भाडे दया.सगळ्या राजकीय मतांचा आदर करा. कधीच कोणाच संभाषण मध्येच खंडीत करू नका. जर तुम्ही कोणाची
मस्करी करत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असल्यास ती मस्करी ताबडतोब थांबवा.जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या. एखाद्याची स्तुती सगळ्यांसमोर करा पण त्याचे दोष त्यालाच सांगा. कोणाच्या वजनावर भाष्य कराण्याची काही आवश्यकता नसते. फक्त म्हणा तु छान दिसतोस किंवा दिसतेस , जर त्यांना वजन कमी करायचं असेल तर ते तुमच्याशी बोलतील.जेव्हा एखादा त्याच्या मोबाईल मधील फोटो तुम्हाला दाखवतो तेव्हा डावी उजवीकडे स्क्रोल करू नका , कारण तुम्हाला कल्पना नसते पुढे काय दिसेल. जेव्हा आपला सहकारी डॉक्टरकडे जातो आहे असं म्हणाला तर, कशासाठी का असे प्रश्र्न विचारू नका फक्त तु ठिक आहेस अशी आशा करतो एवढच म्हणा.त्याला सांगायचं असल्यास तो सांगेल , तुम्ही त्याला खाजगी स्वरुपाच्या आजाराबाबत विचारून खजील करू नका.जेवढा मान साहेबाला द्याल तेवढाच शिपायाला दर्या. आपल्या हाताखालच्या माणसांना तुम्ही कीतीही आदराची वागणूक देता यावर तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची ठरवली जाते,एखादा माणूस आपल्याशी समोरासमोर बोलत असल्यास सतत मोबाईल मध्ये लक्ष देणे ही अक्षम्य चूक ठरते.जो पर्यंत सल्ला मागितला जात नाही तोपर्यंत देऊ नका.जेव्हा एखाद्याशी बऱ्याच वर्षांनी भेटत असाल तेव्हा जोपर्यंत विषय निघत नाही तोपर्यंत त्याचे उत्पन्न व वय याबाबत विचारू नका. जोपर्यंत एखाद्या विषयात तुम्हाला समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत त्या विषयापासून लांब रहाणे योग्य रस्त्यात कोणाची भेट झाल्यास गॉगल काढून संभाषण सुरू करा , ह्यातून आदर प्रतित होतो तसेच साफ संभाषणाच्या दृष्टीने डोळ्यांचा संपर्क आवश्यक असतो .या अशा वेगवेगळ्या व्यक्तीमत्वात आजच्या युवा शक्तीने वेगवेगळ्या अंगाने आपल्याला व्यसनापासून दुर ठेवून आपले घर,समाज, गाव, तालुका, जिल्हा, प्रदेश, राज्य,देश कार्यात मोलाचा वाटा उचलून देशातील सिमेवर लढाईत शहिद होणाऱ्याची संख्या कमी आहे, माञ युवक - युवतीनां व्यसनातून मृत्यू होणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.हि चिंतेची बाब ठरत आहे.एक विसाव्या शतकाच्या बळावर युवा शक्तीने बौद्धिक, मानसिक, शारीरिक, बळाचा वापर देश हितासाठी लावले तरच जीवन जगण्यासाठीचा आनंद घेतला असे म्हणता येईल.जीवनातील अनेकांना सुख आणि दुःखाचा सामना करावा लागत असतो.आयुष्यातील टप्प्यावर माणसाला नवेनवे आयाम पार पाङावयाचे असताना समस्यांचा एक टप्पा आला की,माणसाच्या जीवनात तणावाची पातळी तयार होऊ लागते .अतिरिक्त दुःख आणि दुःखाचा करून घेतलेला बाऊ
बेकारीतीला समस्यां आणि उच्च शिक्षणाची पाञता असतांना आलेले वैफल्यकंपनी,शासकीय,प्रशासकीय तबाव,खाजगीकरणाचा फटका,मोलमजूरी करणारा वर्ग,
कौटुंबिक अनेकविध समस्या,
शैक्षणिकखर्च ,मुलांच्यालग्न,नोकऱ्या समस्या,नातेवाईक आणि इतरांच्या बाबतीत आपण किती तुलनात्मक स्थिर नसल्यामुळे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल,कौटुंबिक समस्यांचा सोङविण्यासाठी समाजाच्या वतीने मिळणाऱ्या अपमानाच्या वागणूकीमुळे तणाव वाढतो.सामाजिक मोठयापणाचे आव आणल्यामुळे देखील तणाव वाढतो.भौतिक आणि अभौतिक गरजांच्या समस्यांचा ङोंगर असल्यामुळे तणाव वाढतो.विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी याच्यावर अभ्यासक्रम, परीक्षा, बदलेले नवे परीक्षा धोरण, शैक्षणिक फिसचा बोजा,शासकीय आणि निम शासकीय गटातील असणाऱ्या स्पर्धा आणि स्पर्धेच्या तुलनात्मक विचाराने तणाव वाढत जातो.युवक - युवती प्रेम प्रकरणे, मनासारख किंवा मनाच्या विरूद्ध अशावेळी देखील तणाव निर्माण होत असतो.सामाजिक अलिप्तपणा असल्यामुळे तणाव वाढत असतो
अतिशयोक्ती विचार आणि लवकरच लवकर मोठे होण्याची स्वप्न उराशी बाळगून ठेवणारा गटाच्या बाबतीतही तणाव दिसून येतो.सार्वजनिक आणि इतर खाजगीकरणामुळे तणाव येतो,तसेच नोकरी बदलत्या धोरणाचा तणावात रूपांतर बघतांना मिळते आहे ,त्यासह खाजगी रोजच्या रोज कमाई करणाऱ्या गटातील बदलणाऱ्या धोरणे आणि घटना इत्यादींच्यामूळे देखील आपल्याला तणाव वाढलेल्या घटना समजते आहे .शासकीय समुपदेशन न मिळालेल्यामुळेही तणाव येतो.
मिञ,मैत्रीण,पती, पत्नी,भाऊ, बहीण,आई,वङील,मुलगा,मुलगी,काका,काकु,मेहुणा,मेहुणी यासह माणसिक दृष्टीने ठरविण्यात आलेल्या नातेवाईक याच्यापासून मिळणाऱ्या वागणूकमूळे तणाव येतो.अतिशयोक्ती ताणतणावाने व्यसनाचे प्रमाण वाढलेल्या घटना आपण विविध प्रसार माध्यमातून बघत,वाचत आणि पाहत असतो.परंतु शासकीय स्तरावरील असा कोणत्याही प्रकारच्या अभ्यासक्रम किंवा कार्यशाळा राबविले जात नाहीत .मूळात आपल्याला मनाचा विचार हाच महत्त्वाचा भाग आपण समजून घेतला पाहिजे .तरच व्यसनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकेल यांत शंका नाही .वरीलप्रमाणे लेखनातून एकच बाबींचा विचार मांङावयाचा आहे की, सदय परिस्थितीत आपल्या व्यसन मुक्ती करण्यासाठी आपण शासकीय धोरणाचा अंवलब कसा करता येईल यांची जबाबदारी घेणाऱ्यानी काळजी घ्यावी आणि माणूसकीचा आधारवङ सांभाळून घ्यावा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.