औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजशैक्षणिक

करोना व्हायरस लक्षणे व उपाययोजना व्हिडिओ काँन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीर संपन्न

माउंट व्हँली प्री-प्रायमरी /सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल रांजणगाव शे.पु ता.गंगापुर

गंगापूर/औरंगाबाद:संजय काळे― माउंट व्हँली प्री-प्रायमरी /सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल येथे करोना व्हायरस प्रमुख लक्षणे, करोना विषयी दक्षता,आणि त्यावर प्राथमिक स्वरुपातील उपाय योजना यावर विद्यार्थी, पालक,शिक्षक यांच्या करिता जनजागृतीपर आँनलाईन व्हिडिओ काँन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक श्री. एम.बी.भालेराव सर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थी ,पालक,शिक्षक ,यांना रितसर मार्गदर्शन केले.
त्यावेळी विद्यार्थ्यांनी करोना व्हायरस विषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना कलाशिक्षक सी.एल.झोडपे यांनी उत्तरे दिली. या मार्गदर्शन शिबिरात संस्थाध्यक्ष श्री.पंढरिनाथ पवार श्री. कृष्णा पवार सर (संस्था कोषाध्यक्ष) सुनील सुर्यवंशी .कल्याणी भास्कर ,प्रियंका कोकाटे,पल्लवी चव्हाण, वनश्री देशमुख , निशा राठोड ,मणिषा टिपराळे, उषा सावंत ,अर्चना राऊत तसेच लता फुलसांवगे या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह पालकांनी सहभाग नोंदवला होता .

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.