औरंगाबाद जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

केवळ स्वार्थासाठी विरोधक सत्ता परिवर्तन यात्रा काढत आहेत -पंकजाताई मुंडे

ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला औरंगाबादच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दृढ विश्वास!

पाया मजबूत असलेले भाजपचे सरकारच सत्तेवर येणार

राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा केवळ सत्ता मिळविण्यासाठी - विरोधकांवर हल्लाबोल

औरंगाबाद दि. २३ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जनतेच्या प्रश्नांवर संघर्षयात्रा काढली ती वंचित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सत्तेविरुद्ध सामान्यांमध्ये असलेल्या रोशाला वाचा फोडण्यासाठी पण आज काही मंडळी केवळ सत्ता मिळवण्यासाठी यात्रा काढत आहेत. सत्तेशिवाय ते राहूच शकत नाहीत. ज्यांना एवढी वर्षे सत्ता असताना विकासाचे परिवर्तन घडवता आले नाही ते आता स्वार्थासाठी सत्ता परिवर्तन यात्रा काढत आहेत असा हल्लाबोल करून येणा-या निवडणूकीत पाया मजबुत असलेले भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आहे असा दृढ विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.

औरंगाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद, जालना, बीड व परभणी जिल्हयाच्या शक्तीकेंद्र प्रमुख व बूथप्रमुखांच्या क्लस्टर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी ना.पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. त्या म्हणाल्या,राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही तळागातील सर्वसामान्य व्यक्तींना केंद्रबिंदू मानून त्यांच्या उत्कर्षासाठी विविध योजना राबवल्या आहेत, त्याचा प्रसार आणि प्रचार जनतेपर्यंत पोहोचवा. आज राज्यातील प्रत्येक व्यक्तीला भाजप सरकारने राबवलेल्या योजनांचा लाभ मिळत आहे आणि म्हणून विरोधकांनी आमची धास्ती घेतली आहे. आज परळीत जे समारोप सभा घेत आहेत त्यांचा राजकारणातून कायमचा समारोप केल्या शिवाय थांबणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बीड - परभणी -जालना- औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्व जागा जिंकून विरोधकांना झेंडा फडकवण्याची संधी मिळू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यकर्ता हा विजयाचा शिल्पकार

पुढे बोलताना ना.पंकजाताई म्हणाल्या, कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा असून तोच खरा विजयाचा शिल्पकार आहे. विजयाचा मजबूत पाया रचण्याची वेळ आली आहे.
कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने भाजप आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. एक पक्ष जो परिवाराचा आहे पण भाजप हाच परिवार आहे. देश प्रथम नंतर पक्ष अशी समर्पित वैभवशाली परंपरा लाभलेल्या भाजपा सरकारने राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आपण आज जनतेपर्यंत पोहोचवत आहोत ,पुढची सत्ताही तुमचीच असून जी कामे राहिली आहेत ती आम्हीच पूर्ण करू हा विश्वास तुम्ही जनतेला द्या असे आवाहन ना.मुंडेंनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , हरिभाऊ बागडे ,बबनराव लोणीकर ,संभाजी पाटील निलंगेकर , खा.प्रितमताई मुंडे ,सुजितसिंह ठाकूर भाऊराव देशमुख ,भागवत कराड , प्रवीण घुगे , गोविंदराव केंद्रे आदीसह पक्षाचे आमदार ,जिल्हाध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होती.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.