बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजसामाजिक

धनगर समाजाच्या विकासासाठी योजलेल्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून द्या – दत्ता वाकसे

बीड:आठवडा विशेष टीम― तत्कालीन महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी अनुसूचित जमातीच्या 22 योजनाची अंमलबजावणी केली होती त्याचे योजनासाठी आताच्या महाविकास आघाडीचा सरकारने 22 योजनासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दया असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे नगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकते यांनी केले आहे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या विकासासाठी उन्नतीसाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी याप्रसंगी तात्काळ महाराष्ट्र राज्यातील एक कोटी वीस लाख धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीसाठी 22 योजनाची तत्कालीन भारतीय जनता पार्टी सरकारने अंमलबजावणी केली होती परंतु आजमितीला पाहता महाविकास आघाडीच्या सरकारने धनगर समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी अंमलबजावणी केलेल्या अनुसूचित जमातीच्या बावीस योजनासाठी तात्काळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निधी उपलब्ध करून देऊन डोंगरदऱ्यांमध्ये वंचित घटक असलेल्या मेंढपाळ समाजाला व धनगर समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तत्कालिन भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आखलेल्या बावीस योजना त्यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बावीस योजनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन त्याचबरोबर वंचित आणि भटकंती करणाऱ्या धनगर समाजाला महाविकास आघाडीच्या सरकारने न्याय मिळवून दयावा असे देखील धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे पुढे ते म्हणाले की पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर निवड करून त्या महामंडळाला एक हजार कोटीचे पॅकेज द्यावे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील मेंढपाळांना वनविभागाच्या आरक्षित जागेमध्ये चरावू कुरण म्हणून घोषित करावे त्याचबरोबर तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या सरकारने एसटी अनुसूचित जमातीच्या 22 योजना योजलेल्या आहेत त्या योजनासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन या योजनांची अंमलबजावणी करावी असे देखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे वाकसे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.