केज तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

महाराष्ट्र ग्रामिण बँकेत दलालांचा सुळसुळाट ,पैसे दिल्याशिवाय फाईल हलतच नाही ,सोशल डिस्टंसिंगचा फज्जा ,महिला चक्कर येऊन पडली – डॉ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम― केज तालुक्यातील मौजे होळ महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत होळी,लाडेवडगांव, लाडेगांव, कळंब अंबा,मानेवाडी, जवळबन, मुलेगांव या ७ गावांचा समावेश आहे. या ठिकाणाचे शाखाधिकारी बारसे हे दलालां मार्फत पैसे घेतल्याशिवाय फाईल हातातच घेत नाहीत,असा शेतक-यांचा आरोप आहे.त्याचवेळी सोशल डिस्टंग्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येते, उन्हात रांगेत उभे राहून महिला चक्कर येऊन पडल्याची घटना सुद्धा घडलेल्या आहेत.

बालाजी जगताप–

नविन कर्जखाते करण्यासाठी लाख रूपयामागे ५०००रू मागणी केली जाते, पैसे न दिल्यास शेती ऊस लागवड व ५ एक्कर च्या पुढे जरी असली तरी २०-२५ हजारांवर बोळवण केली जाते. जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना सुद्धा नो ड्यूजसाठी अडवणूक केली जाते.

बाबासाहेब जाधव–

मला फाईल साठी जाणिवपूर्वक अडवणूक करण्यात आली, १ लाख ६० हजारांपर्यंत सातबारावर बोजा टाकण्याची गरज नसताना ,बोजासाठी कागदपत्राची व साक्षीदाराची मागणी केली, फाईल करण्यासाठी प्रोसेसिंग फीस बँकेमार्फत कर्ज खात्यातुन वजा केली जाते, तरीसुद्धा फाईल छपाईच्या नावाखाली अतिरीक्त पैशाची मागणी केली जाते. सुशांत अंबाड हे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कामासाठी आहेत त्यांना फाईल छपाईसाठी फोन पे मार्फत ११०० रू.दोन फाईलसाठी द्यावे लागले. त्याची रितसर पावती दिली नाही.

बाबासाहेब लाड: चुक बँकेची ,शिक्षा मला ,खाते क्र. चुकीचा–

बँक मॅनेजर यांच्याकडून माझ्या खाते क्रमांक चुकला आहे, मी १५ दिवसांपासुन बँकेत लाडेवडगाव वरून चकरा माराव्या लागत आहेत, आज-ऊद्या करता करता १५ दिवस होऊन गेले, बँक व्यवहार करता येईना झाले, दुरुस्ती करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे, चुक बँकेची असतान मला शिक्षा कशासाठी?

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.