बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यसामाजिक

शासनातर्फे चर्मकारांना तात्काळ आर्थीक मदत मिळण्यासाठी बीड राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बीड:नानासाहेब डिडुळ― गरिब व गरजु गटई चर्मकार लॉकडॉऊनमुळे घरात बसून आहे. सद्याच्या परिस्थितीत त्यांचा उदरनिर्वाह करण्याचे सर्व मार्ग लॉकडॉऊनमुळे बंद झालेले आहेत.राष्ट्रीय चर्मकार महासंघ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री मा.श्री.बबनराव (नाना) घोलप यांच्या आदेशाने दि. 17/04/2020 रोजी मा.मुख्यमंत्र्यांना या विषयाचे पत्र दिलेले आहे. त्यानंतर ई-मेल वरुन दि. 19/05/2020 रोजी पुन्हा दुसरे पत्र व दि. 06/07/2020 रोजी तिसरे पत्र देण्यात आलेले आहेत. आमचे वरिष्ठ पदाधिकारी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करतच आहेत. तरी मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा पत्र देण्यात आले आहे.गरीब व गरजु गटई चर्मकाराच्या व्यथा समजुन घेवून आपण आपल्या स्तराव असलेला अधिकार वापरुन गरिब व गरजु गटई चर्मकारांना जास्तीं जास्त आर्थीक मदत करावी या मागणीसाठीचे पत्र विलास बामणे ,पुरुषोत्तम भोसले ,हरिदास तावरे ,शिवाजी कांबळे ,आनंद कांबळे ,राजू उणवणे ,अंगद कांबळे ,महादेव डोईफोडे यांनी उद्धव ठाकरे यांना बीड चे जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.