ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीशैक्षणिक

mahresult.nic.in – बारावी (इ.१२ वी) चा निकाल उद्या दि.१६ गुरुवार १ वाजता होणार जाहीर | HSC board Results 2020

मुंबई/वृत्तसंस्था दि.१५:आठवडा विशेष टीममहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक १६/०७/२०२० रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळे पुढीलप्रमाणे आहेत.१. www.mahresult.nic.in२. www.hscresult.mkcl.org३. www.maharashtraeducation.comपरीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिह संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्ध्यांचा निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे १) ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शुक्रवार, दिनांक १७/०७/२०२० ते सोमवार दिनांक २७/०७/२०२० पर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार, दिनांक १७/०७/२०२० ते बुधवार, दिनांक ०५/०८/२०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.२) फेब्रुवारी-मार्च २०२० परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकड़े संपर्क साधावा.३) फेब्रुवारी-मार्च २०२० च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजने अंतर्गत उपलब्ध राहतील. अशी माहितीपत्रक मंडळामार्फत काढण्यात आले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.