सोयगाव तालुक्यात रॅपिड अँटीजन तपासण्या करा ,आरोग्य विभागाला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सूचना

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगाव तालुक्यात संक्रमण नियंत्रित करण्यासाठी तातडीने रॅपिड अँटीजन तपासण्या घेण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा जरंडी(ता,सोयगाव)येथील कोविड केंद्राच्या भेटी दरम्यान तालुका आरोग्य विभागाला दिल्या असून या कोविड केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या भेटीचे आदेश काढण्याच्या सूचना तहसीलदार प्रवीण पांडे यांना दिल्या आहेत.
जरंडी(ता.सोयगाव)येथील कोविड केंद्रावर उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी अचानक भेट दिली.या ठिकाणी असलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली.या ठीकाणी सर्व सोयी तातडीने उपलब्ध करून द्याव्या तसेच कोविड केंद्राचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून आरोग्य विषयक आणि परिसर स्वछाताबाबत काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.कोविड केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य लावून देण्याबाबत सूचना केल्या असून स्थानिक कर्मचाऱ्यांना तातडीने मुख्यालयी राहण्याबाबतच्या सूचना गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांना दिल्या आहे.यावेळी तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांना कोविड केंद्रावरील उपाय योजनाबाबत माहिती दिली.यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास सोनवणे,हर्शल विसपुते,नायब तहसीलदार शेख मकसूद,सतीश देशमुख,मंडळ अधिकारी मारोती धोंडकर,तलाठी दिपाली जाधव,ग्रामसेवक सुनील मंगरुळे उमेश पाटील,लिपिक संतोष पाटील,अविनाश राठोड,अनिल पवार,आदींची उपस्थिती होती.
तालुक्यात तातडीने रुग्णाची माहिती होण्यासाठी रॅपिड अँटीजन तपासण्याकरण्याबाबतच्या हालचाली रात्री उशिरा वेगवान झाल्या होत्या.त्यासाठी एका आरोग्य कर्मचार्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी सांगितले.