सरपंच आणि प्रशासक सोयगाव तालुक्यातील संभ्रम दूर होईना ,अधिकाऱ्यांचे मात्र मौन

सोयगाव,दि.१५:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्याचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात आल्यावर मात्र राजकीय पटलावर सरपंच आणि प्रशासक यावर तालुकाभर चर्चासत्र रंगले असल्याने पुन्हा सोयगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.मात्र संभ्रम काही दूर होत नसल्याने प्रशासक आणि सरपंच याबाबत चर्चा रंगत आहे.
सोयगाव तालुक्यात आगस्ट-सप्टेंबर २०२० मध्ये चाळीस ग्रामपंचायतीच्या मुदती संपत आल्या आहे.शासन पातळीवर मुदत संपणार्या ग्राम पंचायातींवर प्रशासक लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असतांना,मात्र याबाबत रोजच नियम बदलत असल्याने याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.अंतिम निर्णयात शासनाने प्रशासक लागू करण्याचा अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बहाल केला होता.त्यातही माशी शिंकली असल्याच्या चर्चेला वेग आला असून आता मात्र गावाच्या पोलीस पाटील यांच्या हातात गावाचा कारभार देण्याचा निर्णय असल्याच्या चर्चा सुरु आहे.त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या निमित्ताने सोयगाव तालुक्यात प्रशासकाच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.बदलते शासनाचे निर्णय आणि मुदत संपण्याची जवळ आलेली वेळ यामुळे मात्र राजकीय गोटात या चर्चेला पूर्णविराम मिळालेला नाही.
निवडणूक विभाग आणि संबंधित अधिकार्याचे मात्र याबाबत मौन असून सरपंच पदाच्या आरक्षणाच्या पूर्वतयारीला मात्र जिल्हाभर तहसील कार्यालयांमध्ये वेग आल्याने पुन्हा या चर्चेला वेगळी दिशा मिळाली आहे.