बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमीशैक्षणिक

ऑफलाईन बदल्यांचा निर्णय हा शिक्षकांवर कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल – पंकजाताई मुंडे

राज्य सरकारने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज

मुंबई दि.१६:आठवडा विशेष टीम― शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पध्दतीने करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा शिक्षकांवर कोरोनाच्या संकटात आणखी एक संकट आणेल अशा शब्दात पंकजाताई मुंडे यांनी खेद व्यक्त करून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पध्दतीने तर जिल्हातंर्गत बदल्या ऑफलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर पंकजाताई मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असे ऐकले,ज्याचा वशिला नाही,वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल. राज्य सरकारने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल अशी खंत पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत केली आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.