अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

खंडेराव टेमकर यांची कामगार कर्मचारी संघर्ष युनियनच्या राज्य सचिवपदी निवड

निवडीबद्दल खंडेराव टेमकर यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन व स्वागत

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― तालुक्यातील खंडेराव बाबुराव टेमकर यांची कामगार कर्मचारी संघर्ष युनियनच्या राज्य सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली.निवडीबद्दल खंडेराव टेमकर यांचे मित्रपरिवारातून अभिनंदन व स्वागत होत आहे.

बीड जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले खंडेराव बाबुराव टेमकर यांची काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणुन सर्वत्र ओळखले जातात.एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील खंडेराव टेमकर हे 1988 पासून ते आज पर्यंत काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत.टेमकर यांनी यापुर्वी अंबाजोगाई तालुका काँग्रेसचे सरचिटणीस पद,अंबाजोगाई तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्षपद, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्षपद, एनएसयुआयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस,बीड जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस,बीड जिल्हा वसतीगृह समिती (शासकीय) सदस्य तसेच संजय गांधी निराधार योजना अंबाजोगाई (शासकीय) या समितीचे सदस्य यासह विविध पदे भुषविली आहेत.सध्या ते बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत.प्रियदर्शनी रूरल डेव्हलेपमेंट सेवा फाऊंडेशन (वरपगाव) चे ते अध्यक्ष आहेत.राजकिय क्षेत्रात त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण,वैद्यकीय शिक्षण मंञी ना.अमित देशमुख,सौ.रजनीताई पाटील,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे
मार्गदर्शन लाभले आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी खंडेराव टेमकर यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून त्यांची बुधवार,दिनांक 15 जुलै 2020 रोजी कामगार कर्मचारी संघर्ष युनियनच्या राज्य सचिवपदी निवड करण्यात आली.खंडेराव टेमकर यांना निवडीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.कामगार-कर्मचारी संघर्ष युनियनचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय पाटील यांनी टेमकर यांना निवडीचे पञ दिले आहे.ही संघटना राष्ट्रीय पातळीवर कामगार कर्मचारी संघर्ष युनियन म्हणून कार्यरत आहे.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी मैनी हे आहेत.संघटित- असंघटित कामगारांचा बुलंद आवाज बनून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ही कामगार युनियन आग्रेसर आहे.विविध आस्थापना मधील
असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांना सक्षम व संघटित करून राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या सवलती सर्वस्तरांपर्यंत पोहचविणे हे उद्दिष्ट आहे.कामगार कर्मचारी संघर्ष युनियनच्या राज्य सचिवपदी खंडेराव टेमकर यांची नियुक्ती करताना आनंद होत असल्याचे नमूद करून भविष्यात खांद्याला-खांदा लावून कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्यावरची तसेच प्रशासकीय पातळीवर लढाई संघटीतपणे लढू असा विश्वास नियुक्तीपञात व्यक्त केला आहे.खंडेराव टेमकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे मित्र,परिवार तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.