गेवराई तालुकाबीड जिल्हा

बेमुदत साखळी आमरण उपोषण शेतकरी चालुच ठेवणार ; 'स्वाभिमानी' च्या पाणी संघर्ष परिषदेचा एल्गार

गेवराई (प्रतिनिधी) :स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जायकवाडी च्या उजव्या कालव्यातुन हक्काच्या मागणीसाठी चकलांबा तलाठी कार्यालसमोर जेष्ठ संघटक मचिंद्र मामा गावडे ,भाऊसाहेब वळकुंडे यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी बेमुदत साखळी आमरण उपोषण गेल्या 15 फेब्रुवारी पासून करत आहेत या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत लोकप्रतिनिधी, व प्रशासनाने घेतली नसल्याने सदर आंदोलनाला तीव्रता येण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेवराई तालुक्याच्या वतीने चकलांबा येथे पाणी संघर्ष परिषदेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.या परिषदेला अध्यक्ष म्हणून चकलांबा गावचे सरपंच मा सुरेश सेठ जाजू हे होते तर प्रमुख मार्गदर्शन रसिकताई ढगे प्रदेशाध्यक्ष, महिला आघाडी ,अमरसिंह कदम युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ,शर्मिला येवले प्रदेश उपाध्यक्ष विद्यार्थी परिषद, कुलदीप करपे पक्ष जिल्हाध्यक्ष, बीड ,किशोर ढगे परभणी जिल्हाध्यक्ष, शेवगाव ता.अध्यक्ष संतोष गायकवाड,दत्तात्रय फुंदे ,माऊली मुळे पैठण, धनंजय मुळे जि.कोषाध्यक्ष ,विलास ढगे परभणी,किसन सेठ लाहोटी संयोजक राजेंद्र डाके पाटील ता अध्यक्ष गेवराई आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जायकवाडी च्या हक्काच्या पाण्यासाठीचकलांबा परिसरातील शेतकऱ्यांनी संकुचित राजकारण विरहित एकजूट करून पाणी आंदोल तीव्र करणार

―बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे

येत्या 8 दिवसात जर संबंधित विभागाने दखल न घेतल्यास नांदेड कडे जाणारे उजव्या कालव्यातील पाणी रोखून जयकवाडीच्या पाठात शेवगाव, गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन बेमुदत ठिय्या आंदोलन करून तीव्र उद्रेक करणार

―अमरसिंह कदम

(युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष)

शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर शेतकरी पुत्रांनी या लढयात स्वयं स्फूर्तीने उतरले पाहिजे दुष्काळी भागात जनावर जगवण्यासाठी शेतकऱ्यांना नाकी नऊ आले आहे आणि हे सरकार छावणी च्या ऐवजी लावनी बार चालू करून शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे.

―रसिकताई ढगे (प्रदेशाध्यक्ष)

महिला आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना

पाणी संघर्ष परिषदेत पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी उपस्थित होते एकमताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चालू असलेले बेमुदत साखळी आमरण उपोषण ठोस कार्यवाही होई पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.