अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाशैक्षणिक

न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचा सीबीएसई बारावी परीक्षेत शंभर टक्के निकाल

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― केंद्रिय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे मार्च-2020 महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवार,दि.15 जुलै रोजी दुुपारी बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला.त्यात येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूलने बारावी सी.बी.एस.ई. बोर्ड (इंग्रजी माध्यम) परीक्षेत पहिल्याच वर्षी 100% निकाल देवून शिक्षण क्षेत्रात आशेचा किरण निर्माण केला आहे. या संस्थेचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अंबाजोगाई येथे राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकार्यांनी 2004 साली श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाने इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणार्या शाळेची स्थापना केली.या शाळेने गतवर्षी पासुन सी.बी.एस.ई अभ्यासक्रमावर आधारीत इयत्ता 12 वीचे वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांनी लातूर येथे परिक्षा दिली. संस्थेचे सर्वच्या सर्व 18 विद्यार्थी चांगल्या गुणाप्रमाणे उत्तीर्ण झाले आहेत. यात संस्थेचे सागर संपत बळवंत (80.20),ऋषिका सचिन कात्रेला (85), अदिबा फातीमा शेख (82.80), अनुज हरिदास पिसाळ (75.80), सिद्धांत कचरू कांबळे (75.40) आणि शेख मुस्कान (75.20) हे संस्थेच्या गुणवत्ता यादीत पहिले 6 विद्यार्थी झळकले आहेत.अतिशय चांगल्या गुणांनी विद्यार्थ्यांनी पहिल्याच वर्षी 100 टक्के निकाल प्राप्त केला आहे.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,प्रा.वसंतराव चव्हाण,डॉ.डी.एच.थोरात,प्रा.नानासाहेब गाठाळ,दिनकर जोशी,डॉ.विवेकानंद राजमाने,प्रा.सुरेश बिराजदार,संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, प्राचार्य व सर्व शिक्षकवृंद आदिंनी अभिनंदन केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.