अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजशैक्षणिक

जोधाप्रसादजी मोदी कनिष्ठ महाविद्यालयाची 12 वी परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जोधाप्रसादजी मोदी कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा यावर्षी ही कायम ठेवत घवघवीत यश मिळविले.विज्ञान शाखेत 60 विद्यार्थी परिक्षेस बसले होते.पैकी 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा एकुण निकाल 91.6 टक्के इतका लागला आहे.तर कला-वाणिज्य संयुक्त शाखेच्या एकुण निकालाची टक्केवारी 71.05 टक्के इतकी आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    अंबाजोगाईच्या शैक्षणिक वर्तुळात आल्पावधीत नांवारूपास आलेले व गुणवत्तेच्या बाबतीत सर्वार्थाने सरस ठरलेल्या जोधाप्रसादजी मोदी कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता 12 वी परिक्षेत यावर्षी ही उज्ज्वल कामगिरी केली.विज्ञान शाखेचे 60 पैकी 55 विद्यार्थी तर कला-वाणिज्य संयुक्त शाखेचे 38 पैकी 27 विद्यार्थी असे एकुण 98 पैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यात विज्ञान शाखेचा एक विद्यार्थी विशेष प्राविण्यासह,10 विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि 44 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.कला-वाणिज्य संयुक्त शाखेच्या निकालाची एकुण टक्केवारी 71.05 टक्के एवढी आहे.दोन्ही शाखेचा मिळून 83.67 टक्के इतका निकाल लागला आहे.विज्ञान शाखेत प्रथम-सुरजितसिंह नंदकुमार ठाकुर (79.38 टक्के), द्वितीय-सौरभ श्रीहरी मुंडे (71.07 टक्के), तृतीय-दीपक मुक्तेश्वर सपाटे (67.53 टक्के) आणि कला-वाणिज्य संयुक्त शाखेत सर्वप्रथम-भुजंग नरसिंग हजारे (82.46 टक्के), द्वितीय-पुष्पांजली तुकाराम काळे (64.92 टक्के), तृतीय-बिडगर कृष्णा हरिदास (64.15 टक्के) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.कोरोना (कोवीड-19) या कठीण काळात प्राचार्य सि.व्ही.गायकवाड यांचेसह प्रा.एन.एस.सोनवणे,प्रा.आर.बी.होके,प्रा.आर.टी.माले, प्रा.बी.एम.खरात,प्रा.अश्विनी बेंबडे(उगीले),प्रा.वंदना पाटिल,प्रा.मुळे,प्रा.शेख मॅडम या सर्व विषयांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले होते.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव तथा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,प्रा.वसंतराव चव्हाण,डॉ.डी.एच.थोरात,ज्येष्ठ संपादक नानासाहेब गाठाळ,साहित्यिक दिनकर जोशी,डॉ.विवेकानंद राजमान्य,प्रा.एस.ए.बिराजदार,संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी,संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी,महाविद्यालयाचे प्राचार्य सी.व्ही.गायकवाड,विभागप्रमुख एन.एस.सोनवणे मॅडम यांचेसह सर्व प्राध्यापक,शिक्षक व कर्मचारीवृंद आदींनी अभिनंदन केले आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.