परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजशैक्षणिक

परळी:सुदर्शन मुंडे यांचे 88% गुण घेऊन बारावी परीक्षेत घवघवीत यश

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि.सुदर्शन सुरजकुमार मुंडे याने इयत्ता बारावी विज्ञान शाखेमधून 88.46 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपदन केले आहे.
परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांचे नातू व न्यु हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.सुरजकुमार मुंडे यांचे चि.सुदर्शन मुंडे यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मांडवा ता.रिसोड, जि.वाशीम मधून विशेष प्राविण्य मिळवून उतीर्ण झाला आहे. चि.सुदर्शन मुंडे यांनी दहावीचे शिक्षण न्यु हायस्कूल परळी वैजनाथ येथे 92.टक्के घेऊन विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाला होता. तसेच त्याने बारावीच्या विज्ञान शाखेतून 650 पैकी 575 गुण घेऊन 88.46 टक्के घेऊन उतीर्ण झाला आहे. यापूर्वीही चि.सुदर्शन मुंडे यानी विविध स्पर्धा परिक्षात यश मिळवले आहे. रात्रंदिवस केलेली मेहनत आणि शिक्षक वृंदाकडून मिळालेले मार्गदर्शन यामुळे आपण यश संपादन केल्याचे त्याने सांगितले. चि.सुदर्शन मुंडे याच्या यशाबद्दल त्याचे अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वय तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव कायंदे, प्राचार्य ए.व्ही.मुंडे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्र परिवार, पत्रकार, नातलाग, कन्हेरवाडीचे ग्रामस्थ व सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.