आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ३१ :- ज्येष्ठ, अनुभवी,मार्गदर्शक प्रणवदांचे निधन ही देशाची मोठी हानी आहे.माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दु:ख व्यक्त करुन डॉ. प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.
महसूलमंत्री श्री. थोरात आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गेल्या पाच दशकांहून अधिक काळ प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, सभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. डॉ. प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील मोठे नेतृत्व होते. देशासमोरच्या आव्हानात्मक परिस्थितीत राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय साधून प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आदरणीय प्रणवदांकडे होतं. त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राचीही हानी आहे. देशाच्या या महान नेतृत्वाला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.