आष्टी तालुकाब्रेकिंग न्युजराजकारण

भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या दूरदृष्टीमुळे लवकरच आष्टी शहराची स्मार्टसिटी कडे वाटचाल

पाटोदा:गणेश शेवाळे― उस्मानाबाद,बीड,लातुर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे तीन जिल्हाचे प्रतिनिधी असले तरी आष्टी मतदारसंघ हा त्यांचा हक्काचा असुन त्यांना आष्टी मतदारसंघाचा गाडा अभ्यास आहे. चर्चा तर गल्ली पासुन ते दिल्ली पर्यत त्यांची होती व वरिष्ठ नेत्यांजवळ त्याच्या शब्दाला मान आहे. मतदारसंघात विकास कामे कसे खेचुन आणायची कला असल्याने मतदारसंघात कोट्यावधी रुपये मंजूर करुण आणले असल्याने आष्टी शहरात गल्लो-गल्ली लाईट बसवलेल्या पाण्यासाठी पाईप लाईन तर आता रस्ता व नाल्याची काम धुमधडाक्यात चालू आहेत. आष्टी शहरात लाखो कोट्यवधी रुपयाचे रस्ते मंजूर करून आणले आहेत व प्रत्यक्षात कामेही सुरू झाले असल्याने आष्टी शहरातील मतदार राजा खुश असून रस्ते व नाल्या चांगल्यादर्जाचे होऊ लागल्यामुळे लवकरच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या दूरदृष्टीमुळे आष्टी शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरू झाली आहे अशी चर्चा बीड जिल्ह्यातील युवकांमध्ये चालू आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.