औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजशेतीविषयकसोयगाव तालुका

सोयगाव तालुक्यात मुसळधार ,घोसला गावावर ढगफुटी ,८० एकरवरील पिके बाधित ,४० एकर पिके पाण्यावर तरंगली

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात गुरुवारी पहाटे पासून कोसळधारा पावूस झाल्याने तालुक्याचे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले होते मात्र घोसला गावावर ढगफुटीचा पावूस झाल्याने ८० एकरवरील खरीपाचे पिके बाधित होवून चाळीस एकरवरील मका,कपाशी आदी पिके नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने घोसला गावात तब्बल ५० शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याने घोसला ता.सोयगाव गावावर नैसर्गिक संकट कोसळले आहे.
सोयगाव तालुक्यात गुरुवारी पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने तालुक्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.तालुक्यातील कृषी प्रधान गाव असलेल्या घोसला गावावर ढगफुटीचा पावूस झाला त्यामुळे गावाजवळील खटकळ नदीला मोठा पूर आल्याने नदीच्या लगतची दोन्ही बाजूंच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने तब्बल ८० रकर वरील खरिपाच्या पिकांना धोका झालेला असून ४० एकरवरील पिके दिवसभर पुराच्या पाण्यावर तरंगून घोसला शिवारातील २० एकरवरील शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्याची घटना घडली आहे.या प्रकारामुळे घोसला गावावर निसर्गाचा कोप झाला असून शेतकऱ्यांचे वाढीस आलेले जोमदार मका,ज्वारी यासह मुख्य पिक म्हणून ओळखल्या जाणारे कपाशीचे पिके वाहून गेली आहे.या शिवारात अद्यापही ४० एकरवरील कपाशीचे पिके अद्यापही पुराच्झ्या पाण्यावर तरंगून आहे.खटकळ नदीच्या पात्राने दिशा बदलाविल्याने नदीचे पात्र फुटून पुराचे पाणी ८० एकरावरील शेतात शिरल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.५० शेतकऱ्यांचे पिके जमिनीसह वाहून गेली आहे.यामध्ये काही शेताकात्यांची मिरची,ज्वारी,भाजीपाला,इतर पिकेही पुराच्या भक्षस्थानी सापडली आहे.

पुराच्या पाण्यात शेतात अडकले १३ शेतकरी-

पावसाचा जोर सुरूच असतांना झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या १३ शेतकऱ्यांना शेतातच नदीच्या पुराने घेरल्याने निवृत्ती सोनार,राहुल गवळी,उत्तम बोरसे,अण्णा बोरसे,सोमनाथ गव्हांडे,गणेश गव्हांडे,आत्माराम गव्हांडे,शांताराम सोनार,गोकुळ गवळी,अनिल गव्हांडे,किशोर बाविस्कर,प्रमोद वाघ,युर्वराज गव्हांडे,हे अकरा शेतकरी पुराच्या वेढ्यात शेतातच अडकल्याने त्यांना शेतातील; पुरातून बाहेर काढण्यासाठी मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे,ज्ञानेश्वर गवळी,रमेश गव्हांडे,सादिक तडवी,ज्ञानेश्वर युवरे,नितीन गव्हांडे,प्रदीप गव्हांडे,प्रकाश गव्हांडे,अमोल बोरसे आदि ग्रामस्थांनी पुरातून बेहर काढण्यासाठी मोहीम राबवून त्यांना बाहेर काढले होते.

घोसला शिवारात झालेल्या ढग फुटीच्या पावसात तब्बल दहा विहिरी बुजून गेल्या असून यामध्ये दहा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसानीत अल्पभूधारक शेतकरी निलेश सोनार,निवृत्ती सोनार,प्रवीण गवळी,दिलीप गवळी या चार शेतकऱ्याचे प्रत्येकी दोन एकर क्षेत्र पिकांसह वाहून गेले आहे.

निवृत्ती गवळी―महिनाभरापासून जीवापाड जपलेल्या पिकांना डोळ्या देखत वाहत जातांना पाहून मोठ्या वेदना झाल्या आहे.शेतीवर उपजीविका करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे.आधीच पावसाने दडी मारल्यामुळे मोठा खर्च करून आंतर मशागातीतून शेतीला जिवंत केले होते परंतु निसर्गाच्या या चक्राने पुनः चक्रात टाकले आहे.

-------------------------

प्रवीण गवळी–दोन एकर शेतावर कष्ट करण्याची परंपरा आहे,यावर आलेल्या उत्पन्नावर घरखर्च भागवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा माझी परंपरा मात्र यंदाच्घ्या खरीपात खंडित झाली आहे.यामध्ये माझे एक एकर क्षेत्र वाहून गेले असून शेतात पुराच्या ओढ्यात दगड वाहून आले असल्याने शेतीचे डोळ्यादेखत वाळवंट झाले आहे.

घोसला गावावर निसर्गाचे मोठे संकट कोसळूनही प्रशासनाच्या एकही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने अद्यापही या गावाला भेटी दिलेल्या नाही कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याला मात्र या गावात येण्याची तसदी घेतलेली नव्हती यामुळे शेतकऱ्यांचा मोठा रोष वाढला आहे.

चार तास पूर-घोसला गावाजवळील खटकळ नदीला आलेला पुराचे थैमान तब्बल चार तास सुरूच होते त्यामुळे पुराचे पाणी वाहून जाणाऱ्या पाचोरा गावातील गावांना पाचोरा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले होते.जळगाव जिल्ह्यातील काही गावांना घोसला नदीच्या पुराचा फटका बसल्याचे वृत्त रात्री उशिरा हाती आले होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.