औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारणशेतीविषयकसोयगाव तालुका

औरंगाबाद: पालकमंत्र्यांनी घेतली घोसला गावाच्या शेती नुकसानीची दखल ,कन्नडच्या आमदाराकडून पाहणी

सोयगाव,दि.१७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
धरणाचा सांडवा चुकीच्या दिशेने काढल्यामुळे घोसला गावात ढगफुटी होवून गुरुवारी आलेल्या पुराच्या प्रलयाबाबत मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांचेशी नुकसानीबाबत फोनवरून चर्चा करताच कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी शुक्रवारी घोसला गावाच्या नुकसानीबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना शासन पातळीवरून नुकसान भरपाई देण्याबाबत आश्वासन देवून तालुका प्रशासनाच्या पथकाला पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या आहे.
घोसला गावावर गुरुवारी झालेल्या ढग फुटीच्या पावसाने धरण ओव्हरफ्लो होवून धरणाचा सांडव्याची दिशा चुकीच्या पद्धतीने काढल्याने या धरणाच्या पुराचे पाणी नदीचा प्रवाह शेतात शिरून पिकांना पाण्यासोबत वाहून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या पुरात तब्बल ८० एकर क्षेत्र बाधित झाले असून शंभर टक्के नुकसान झाल्याची माहिती आमदार उदयसिंग राजपूत यांनी दिली.मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने नुकसान भरपाई बाबत निवेदन दिले.यावेळी बाधित शेतकऱ्यांसमवेत उपजिल्हा प्रमुख राजू राठोड,चंद्रकांत पाटील,तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार सतीश देशमुख,तलाठी ललित पाटील,आप्पा वाघ,निलेश सोनार,श्रावण युवरे,समाधान सोनवणे,एकनाथ गव्हांडे,आदींसह शंभर शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना अपशब्द बोलणाऱ्या तलाठ्याला धारेवर धरले -

नुकसानीची माहिती देतांना घोसला सज्जेच्या तलाठ्याने शेतकऱ्यांना अपशब्द वापरून बोलाल्याप्रकारणी केलेल्या तक्रारीवरून आमदार उदयसिंग राजपूत यांनी संबंधित तलाठ्याला धारेवर धरून शेतकऱ्यांना अपशब्द बोलणाऱ्या या तलाठ्यावर जिल्हाधिकारी औरंगाबाद यांची भेट घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

आमदाराच्या दौऱ्यात कृषी विभाग आणि गावपातळीवरील ग्रामसेवक गैरहजर असल्याबाबत शेताकायांनी आमदार उदयसिंग राजपूत यांचेजवळ रोष व्यक्त करून थेट तालुका प्रशासनाच्या आणि आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान गैरहजर ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    घोसला गावाजवळ जिल्हा परिषद सिंचन विभागाचे धरण आहे,या धरणाला ढग फुटीच्या पावसात ओव्हरफ्लो झाल्याने सांडवा चुकीच्या दिशेने काढल्यामुळे पाण्याचा प्रवाह शेतात उतरल्याने तब्बल ५० शेतकऱ्यांचे ८० एकरवरील पिके पुराच्या तडाख्यात वाहून गेल्या प्रकरणी संबंधित धरणाच्या मुख अभियंत्यास दूरध्वनीवरून धारेवर धरून सांडवाचे काम करण्याच्या सूचना आमदार उदयसिंग राजपूत यांनी दिल्या आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.