पाचोरा येथे पथ विक्रेत्यांना आत्मनिर्भर निधी योजना मार्गदर्शन
पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे या परिस्थितीमुळे मोठे उद्योजक शेतकरी लघु उद्योजक आणि सर्व समाजघटक प्रभावित झाले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पथविक्रेते,भाजीपाला, दूधवाले चहा विक्रेते आदी छोटे व्यवसाय करणाऱ्या बांधवांना आर्थिक बळ मिळावे त्यांच्या व्यवसायाला उभारी यावी याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा हजार रुपये अर्थसहाय्य अशी आत्मनिर्भर योजना सुरु केली आहे.योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन खा उन्मेषदादा यांनी केले आहे. पाचोरा शहरातील बचत भवन येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि पथ विक्रेते व्यवसायिकांना मार्गदर्शन करताना खासदार पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे ,व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन पंस सभापती वसंत गायकवाड प्रज्ञावंत आघाडीचे सुनील पाटील तालुका सरचिटणीस गोविंद शेलार संजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोणामुळे सर्वांनाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र या परिस्थितीत रडायचे नाही तर लढायचे आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास खासदार उमेश दादा यांनी व्यक्त केला. कोरोना संकटाशी लढताना केंद्र सरकारने पाच प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब केला असून गरीब कुटुंबांना अन्नधान्य मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना वाढीव पेन्शन जनधन खाते धारकांना अर्थसाह्य उज्वला गॅस योजना लाभधारकांना गॅस सिलिंडरचे वितरण बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे अर्थसहाय्य लघुउद्योजकांना तीन लाख रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य शेतकरी बांधवांना तिमाही अर्थसहाय्य आदी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्या पथक विक्रेत्यांची आर्थिक समस्या लक्षात घेऊन या वर्गाला खेळते भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी आत्मनिर्भर ही अभिनव योजना अमलात आणल्याचे खासदार पाटील यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.यावेळी अमोल शिंदे यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शन करताना पथ विक्रेत्या बांधवांना शक्य ती सर्व मदत करणार असून याकामी अडचण येऊ देणार नाही .त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाचोरा टिम भाजपा तत्पर असल्याची ग्वाही दिली. आत्मनिर्भर निधीचा लाभ सर्व योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शहरात मदत केंद्र सुरू करणार असून सर्व कार्यकर्ते मदत करतील असे सूतोवाच अमोल शिंदे यांनी यावेळी केले. प्रसंगी शहराध्यक्ष रमेश वाणी यांनीही विचार मांडले. प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष समाधान मुळे दीपक माने सिद्धांत पाटील जयश्री चौधरी राजेश संचेती त्यांच्यासह पथ विक्रेता व्यवसायिक पुरुष बांधव व महिला भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद शेलार यांनी तर राजेश संचेती यांनी आभार व्यक्त केले