सोयगाव,दि.२०:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडी कोविड केंद्रातील दाखल कोरोनाच्या रुग्णांशी,सोमवारी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी कौटुंबिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी कोविड केंद्राच्या प्रवेशद्वारावरून थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृती आणि व्यवस्थेविषयी चौकशी करून त्यांना धीर दिला आहे.
जरंडी(ता.सोयगाव)येथील कोविड केंद्राला पंचायत समिती आणि महसूलच्या पथकांनी भेटी देवून या केंद्राच्या व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी थेट कोविड केंद्राच्या प्रवेशद्वारातून रुग्णांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीविषयी आणि व्यवस्थेविषयी विचारपूस करून त्या कोरोनाचं दहा रुग्णांना धीर देवून यापुढेही येणाऱ्या अडचणींबाबत या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचे आवाहन केले.यावेळी रुग्णांनी या संपर्क मोहिमेबाबत समाधान व्यक्त केले होते,यावेळी नायब तहसीलदार मकसूद शेख,हिरालाल गोरे,हर्शल विसपुते,अनिल जोहरे आदींची उपस्थिती होती.
0