आष्टी तालुकाटेक्नॉलॉजी

दिव्यांग बांधवांनी वैश़्विक ओळखपत्र शिबीराचा लाभ घ्यावा - अण्णासाहेब साबळे

आष्टी : दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत वैश्विक ओळखपत्र (unique disability ID) वितरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद च्या समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी वैश्विकओळखपत्र शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी या अभियानातंर्गत त्या - त्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेवून आपल्या वैश्विक ओळखपत्रासाठी आँनलाईन नोंदणी करावी.असे आवाहन मी अण्णासाहेब साबळे आपणांस करत आहे.दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानातंर्गत वैश्विक ओळखपत्र वितरण करण्यासाठी तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात आलेले आहे.प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.हे शिबीर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र/ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालय येथे होणार आहे.अधिक माहितीसाठी संबधित रुग्णालयातील डॉक्टर तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.शिबीरास उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी आँनलाईन अपंग प्रमाणपत्र (SADM),आधारकार्ड,रेशनकार्ड आणि नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो यांच्या मूळ प्रती व छायांकित प्रती (झेराँक्स) सोबत घेवून जाव्यात.तरी याद्वारे आपणांस कळवितो की,या शिबीराचा फायदा फक्त आँनलाईन अपंग प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांग बंधू-भगिनींनाच होणार आहे.ज्यांच्याकडे आँनलाईन प्रमाणपत्र नाही त्यांना वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी करता येणार नाही.आँनलाईन प्रमाणपत्र नसणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी अगोदर तात्काळ आँनलाईन प्रमाणपत्र काढावे त्यानंतरच त्यांना वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी करता येईल.भविष्यात सर्व शासकीय सोई - सवलती वैश्विक ओळखपत्रावरच मिळणार आहेत.तरी वरील शिबीर दरम्यान तालुक्यातील सर्व दिव्यांग संघटनेच्या पदाधिऱ्यांनी उपस्थितीत राहून सहकार्य करावे अशी विनंती मी अण्णासाहेब साबळे आपणांस माहीतीस्तव कळवित आहे.

अण्णासाहेब साबळे

प्रहार दिव्यांग क्रांती तालुका अध्यक्ष
संपर्क : 8888294821

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.