बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांची संघटित गुन्हेगारी संपवावी―कालिदास आपेट यांची मागणी

बीड:आठवडा विशेष टीम―देवेंद्र सरकारने सरसकट कर्जमुक्तीची अंमलबजावणी न केल्याने सलग तीन वर्ष पीककर्जाचे वाटप रखडले आहे.बँक अधिकाऱ्यांनी रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या परिपञकांना हरताळ फासला आहे. पीककर्जासाठी शेतातील उभे पीकच तारण असताना मस्तवाल बँक अधिकारी पीककर्जासाठी इतर बँकांचे बेबाकी प्रमाणपञ, जमिनीचा 7/12, 8-अ,सर्च रिपोर्ट, फेरफार नक्कल,जमिनीचे मुल्यांकन, स्टँम्प पेपर आणि रजिस्टर्ड गहाणखत करायला भाग पाडित आहेत. शेतकऱ्याकडून बेकायदेशिर कागदपञे घेणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची संघटीत गुन्हेगारी बीडचे जिल्हाधिकारी झोपआस्तिक कुमार पाण्डेय यांनी संपवून पीककर्जाचे वाटप करावे अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली.
शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी बेबाकी प्रमाणपञा विरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेवून रिजर्व बँक ऑफ इंडियाने 30 एप्रिल 2007 रोजी पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्यांनी काेणती कागदपञे मागावीत? याबाबतच्या स्पष्ट सुचना दिल्या आहेत.18 जून 2010 आणि 12 मे 2012 रोजी रिजर्व बँक ऑफ इंडियाने KCC धोरणांतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी बँक अधिकाऱ्यांनी कशी प्रक्रिया पुर्ण करावी?याच्या तपशिलवार सुचना दिलेल्या आहेत.बीडचे जिल्हाधिकारी रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या परिपञकाकडे दुर्लक्ष करीत असल्याने पीककर्जासाठी बँक अधिकारी बेकायदेशिर प्रक्रिया राबवित आहेत.
राष्ट्रीयीकृत,ग्रामीण,खाजगी आणि सहकारी बँकांच्या अधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपासाठी प्रत्येक शाखेत एजंट लावले आहेत.बेबाकी प्रमाणपञासह बँक अंथिकाऱ्यांनी सांगितलेली कागदपञे गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांना किमान दहा हजाराचा खर्च करुन महिनाभर पायपीट करावी लागते.एजंटामार्फत फाईल न केल्यास 7/12 वर कर्जाचा बोझा नोंदवूनसुध्दा शेतकऱ्याला कर्ज दिले जात नाही.तलाठी आणि बँक अधिकाऱ्यांची संघटित गुन्हेगारी संपविण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी तातडीने कारवाई करावी.असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजिमोद्दीन शेख,अनुरथ काशिद,आनंद भालेकर, संजय आपेट, सुर्यकांत सावंत, अँड.मनिषा रुपनर, गोरख पवार, रामेश्वर गाडे,रामप्रसाद गाडे,हनुमान शिंदे, निलाराम टोळे,सुभाष मायकर, राधाकिसन गडदे,तानाजी कदम,मच्छिंद्र जगताप,अब्दुल फताह पटेल,विनोद बुरांडे,जे.डी.देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button