मातोश्री रमाई आंबेडकर जयंती निमित्त भिमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम
आठवडा विशेष|प्रतिनिधी
अंबाजोगाई दि.२५: माता रमाईंचा त्याग व पाठबळामुळे बाबासाहेब हे नांव जगमान्य झाले. रमाईंच्या नावाने अंबाजोगाईत होणारा महोत्सव प्रेरणादायी असल्याचे सांगून या देशावर बाबासाहेबांचे मोठे उपकार आहेत. त्यांनी लिहीलेल्या राज्य घटनेमुळे आज भारत अखंड देश राहीलाय. बाबासाहेबांचे विचार अंगिकारल्याने आंबेडकरी समाजाची प्रगती झाली व पुढेही होईल.त्यामुळे मुलांना उच्च शिक्षीत करा, निर्व्यसनी बनवा,चांगले संस्कार करा.आज समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.
शिकलेल्या लोकांनी आंबेडकरी चळवळीस योगदान द्यावे.सत्ता ही प्रगतीची गुरूकिल्ली आहे.काळ बदलतोय, राजकिय हवा बदलतेय, हे ओळखा.वंचित आघाडीच्या सर्वच सभांना आज लाखोंची गर्दी होतेय.तेव्हा अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना साथ व ताकद द्या,तेच तुम्हाला सत्ता देतील असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले.ते अंबाजोगाईत आयोजित मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सवात उदघाटक म्हणून बोलत होते.
मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणेच यावर्षी मातोश्री रमाई प्रतिष्ठान, अंबाजोगाई आयोजित मातोश्री रमाई आंबेडकर जयंती उत्सव समिती,अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित रमाई महोत्सव-2019 मध्ये विविध उपक्रम घेण्यात आले.जयंती महोत्सवाचे हे दहावे वर्ष होते.या महोत्सवाच्या आयोजनासाठी निमंञक मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.राहूल धाकडे यांच्या संयोजन समितीने पुढाकार घेतला.यावेळी विचारपीठावर उदघाटक म्हणून आनंदराजजी आंबेडकर (सरसेनानी, रिपब्लिकन सेना, महाराष्ट्र राज्य) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले.तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे हे होते.यावेळी प्राचार्य मेजर डॉ.एस.के. खिल्लारे(स्वा.रा.ती.महाविद्यालय),अॅड. सुनिल सौंदरमल(संस्थापक अध्यक्ष, आधार मल्टीस्टेट) हे प्रमुख अतिथी तर डॉ.अजय ओव्हाळ,(शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,लातूर), अॅड.विशाल जोगदंड (सुप्रिम कोर्ट,दिल्ली),जितेंद्र पोटभरे (ग्रामविकास अधिकारी),विजय वाकोडे(परभणी),रवी वाघमारे,राजेंद्र घोडके, संजय बोधनकर, शोभाताई गायकवाड,मुख्याध्यापक, वेणूताई चव्हाण (कन्या) विद्यालय,अंबाजोगाई तसेच मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष व निमंञक
डॉ.राहूल धाकडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजेंद्र घोडके, अनुष्का सोनवणे,मुख्याध्यापिका शोभाताई गायकवाड,प्रा.सा.द.सोनसळे,किरण चक्रे यांचा सन्मान करण्यात आला. मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपादित विशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावर्षी महोत्सवाने वेगळेपण जपत “आंबेडकर कुटूंबातील बाबासाहेबांचे नातू आनंदराजजी आंबेडकर यांना ऐकण्याचा दुग्धशर्करा योग जुळवून आणला.प्रास्ताविक करताना डॉ.राहुल धाकडे म्हणाले की, रमाई प्रतिष्ठान, अंबाजोगाईच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम व सोबत प्रबोधनपर भिमगीतांचा कार्यक्रम ही आयोजित करीत आहोत.माता रमाईंचा “त्याग व जीवनकार्य” हे नव्या पिढीसमोर व समाजासमोर पोहोचविण्यासाठीच हा उपक्रम सुरु केला आहे. आंबेडकरी कुटूंबाशी ऋणानूबंध ठेवून गेल्या दहा वर्षांत समाजात काम करणारे कार्यकर्ते,लेखक, विचारवंत,कलावंत,भिमशाहीर,साहित्यिक, समाजसेवक यांचा वेळोवेळी सन्मान केला.यापुढे एकिकडे बाबासाहेबांचे नांव घ्यायचे व कुणाच्याही मागे जय-जयकार करीत फिरणा-या अशा वाट चुकलेल्या समाजातील तरूणांना बाबासाहेबांच्या चळवळीशी जोडण्याचे काम करणार असल्याचा मनोदय डॉ.धाकडे यांनी व्यक्त केला. यावेळी प्राचार्य मेजर डॉ.एस.के.खिल्लारे, डॉ.अजय ओव्हाळ,अॅड.विशाल जोगदंड यांची समायोचित भाषणे झाली.तर अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ.कमलाकर कांबळे यांनी,“जो नीतिमान असेल त्याला बौध्द समजले पाहीजे असे स्वता: बाबासाहेबांनीच सांगीतले आहे.तेव्हा कडवे बौध्द व्हा,धम्माचे आचरण करा,आपल्या पैशातून आपल्या महामानवांच्या जयंती साज-या करा, डॉ.राहूल धाकडे यांनी रमाई महोत्सवासारखा अतिशय चांगला उपक्रम सुरू केल्याचे सांगून आता एकञ येवून आंबेडकरी चळवळ पुढे नेऊ असा आशावाद डॉ.कांबळे यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनंत कांबळे यांनी करून उपस्थितांचे आभार भिमाशंकर शिंदे यांनी मानले.प्रारंभी गायक बळीराम उपाडे व संच यांच्या “भीमगीतांच्या प्रबोधनपर कार्यक्रमाची” सुरेल गितांची मेजवानी अंबाजोगाईकरांना ऐकावयास मिळाली.
त्यानंतर मातोश्री रमाई आंबेडकर व महापुरूषांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले.मशाल प्रज्ज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. संयोजन समितीने मान्यवरांचा सत्कार केला.रविवार, दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता या महोत्सवाचे उदघाटन झाले.वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, बसस्थानकासमोर अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या या जयंती महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमाई प्रतिष्ठान, अंबाजोगाई आयोजित मातोश्री रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाच्या यशस्वितेसाठी जयंती महोत्सव समितीचे निमंञक डॉ.राहूल धाकडे (अध्यक्ष) तसेच संयोजन समितीचे प्रा.अनंत कांबळे,मुजीब काझी,विश्वास चोबे,रविंद्र केंद्रे, डॉ.विनायक गडेकर,भिमाशंकर शिंदे,डॉ.विकास जाधव,प्रियदर्शी मस्के,संतोष बोबडे,डॉ.प्रशांत दहिरे,आरती लिंबगावकर,पञकार रणजित डांगे,डॉ.प्रमोद समुद्रे,सुनिल व्यवहारे,आनंद सरवदे, सुशिल कुंबेफळकर, रमाकांत उजगरे, अनिकेत पोटभरे,विक्रमसेन आगळे, अतुल जोगदंड,विशाल लोंढे, वैभव ओव्हाळ,नंदकुमार पोटभरे,दिपक गुळभिले, अतुल ढगे, सचिन राठोड आदीं सहीत सर्व संयोजन समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी जयंती महोत्सवास प्रा.एस.के. जोगदंड, कॉ.बब्रुवाहन पोटभरे,अॅड.शामभाऊ तांगडे, आधार मल्टीस्टेट अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष प्रा.डी.जी. धाकडे,अॅड.अनंतराव जगतकर,नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक संतोष शिनगारे,संतराम पारवे,प्रा.एस.डी.धाकडे,पुष्पाताई बगाडे आदींसहीत आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते, युवक, महिला,आदींची मोठया संखेने उपस्थिती होती