आठवडा विशेष|प्रतिनिधी
परळी: महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री तथा बीड जिल्हाच्या पालकमंत्री मा.ना.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रमूख उपस्थित परळी तालूकयातील व शहरातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजने अंतर्गत वयोवृद्ध विधवा दिव्यांग घटस्फ़ोटीत दुर्धर आजाराने ग्रस्त विविध वेगवेगळ्या योजने अंतर्गत शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबातील व्यक्ती यांचा जाहीर मेळावा दि.२ फेब्रुवारी २०१९ शनिवार रोजी छञपती शिवाजीराजे चौक ,अक्षता मंगल कार्यालय परळी वै. येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. खा. डाॅ. प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे व भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या कायॅक्रमात मा. ताईसाहेबाच्या हस्ते लाभार्थीच्या आॅनलाईन बँक खात्यावर पगारीचे वाटप व नवीन ३४०० लाभार्थी यांना पगार मंजूरीचे प्रमाणपञ वाटप करण्यात येणार आहे लाभार्थी मंजूरी दि. १८.९.२०१८ च्या संजय गांधी निराधार कमिटीची मिटींग मधील यादी मा.ना. पंकजाताई व खासदार डाॅ प्रितमताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात तालूका व शहराची यादी बोर्डावर लावलेली आहे या भव्य मेळाव्यास जुने लाभार्थी , नवीन लाभार्थी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संजय गांधी निराधार समितीचे परळी तालूकाअध्यक्ष सुधाकर पौळ व सर्व सदस्यांनी केले आहे.
0