बीड जिल्हाहेल्थ

बीडच्या अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सकांच्या पाहनीत चार डॉक्टरांचा कर्तव्यात कसूर

बीड दि.२५ :जिल्हारुग्णालयातील दांडीबहाद्दर डॉक्टरांमुळे रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या डॉक्टरांना त्याचा कसलाही फरक पडत नाही, सोमवारी अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड व डॉ.आय.व्ही.शिंदे यांनी सकाळी ९ वाजता पाहनी केली असता केवळ ओपीडीमध्येच चार डॉक्टर गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सर्वसामान्यांना माफक दरात उपचार मिळतात म्हणून जिल्ह्याच्या काण्याकोपर्‍यातून येथे मोठ्या संख्येने रुग्ण येतात. मात्र येथील दांडिबहाद्दर डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना अनेक वेळा आल्या पावली परत जाण्याची वेळ येत आहे. रुग्णांनी डॉक्टरांना सेवा देण्याबाबात विचारपूस केल्यास हे सरकारी दवाखाना आहे. आम्ही कोणाकोणाकडे लक्ष द्यायचे तुम्हाला चांगले उपचार हवे असतील तर खासगी दवाखान्यात जा म्हणून हेच डॉक्टर रुग्णांना थेट खासगी दवाखान्यात जाण्याचा फुकटचा सल्ला देत आहेत. ही पाहणी केवळ ओपीडी विभागतच करण्यात आली. सर्व रुग्णालयात केली असती तर अनेक दांडीबहाद्दर डॉक्टर समोर आले असते.

हे आहेत दांडीबहाद्दर डॉक्टर

  • ऑर्थो विभागातील -डॉ.प्रविण देशमुख, डॉ.मनोज घडसिंग, डॉ.अभिनव जाधव
  • कान-नाक-घसा विभागातील -डॉ. मिनाक्षी साळुंके

गैरहजर डॉक्टरांना नोटीसा पाठवणार

जिल्हारुग्णालयात वेळेवर डॉक्टर येत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्याअनुषंगाने सोमवारी सकाळी ९ वाजता. ओपीडी विभागात पाहनी केली असता. चार डॉक्टर गैरहजर होते. ते सकाळी ९.३० च्या नंतर उपस्थित राहीले. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार आहेत.
डॉ. सुखदेव राठोड
अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.