आष्टी तालुकापाटोदा तालुकाबीड जिल्हा

आष्टी मतदारसंघातील तीन जिल्हासरहद्द रस्त्यांना २५ कोटीचा निधी मंजूर ; लवकरच निविदा आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात - आ.सुरेश धस यांची माहिती

आष्टी दि.२६ (प्रतिनिधी) : मतदार संघातील जिल्हासरहद्द रस्त्यांच्या कामाला निधी उपलब्ध करण्यासाठी ना.चंद्रकांत पाटील यांच्याकडे ना.पंकजाताई मुंडे यांनी शिफारस केल्याने तीन रस्त्याच्या कामास २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आ.सुरेश धस यांनी सांगितले.

संत भगवान बाबांचे जन्मस्थळ सावरगावला जोडणारा मुगगाव,ब्राम्हगांव आष्टी मार्ग रस्त्याला ५ कोटी दिले तसेच श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव,शेडाळा,देऊळघाट,प्र रा मा १६,पिंपळगाव घाट ,दौलावडगाव ००/०० ते २९ किमी रस्त्याच्या कामासाठी १० कोटी तर जिल्हा सरहद्द हिंगणी,टाकळसिंग,जामगाव,आष्टा ह.ना.रा.मा.५७ चिंचपूर,मातकुळी ते मातावळी ८/०० ते २७ किमी रस्ताकामास १० कोटी मंजूर केल्याने दोन जिल्ह्याला मधला मार्ग तयार होणार असल्याने हे तीनही रस्ते व्हावेत म्हणून या भागातून आग्रही मागणी आ.सुरेश धस यांच्याकडे पाठपुरावा केल्याने या रस्त्याला मंजुरी मिळवण्यात यश आले.आ.सुरेश धस यांनी महत्वाचा प्रश्न मार्गी लावला म्हणून त्या भागातील प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य पती माऊली जरांगे,अमर निंबाळकर,आष्टी पंचायत समिती सभापती पती अशोक इथापे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.