बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी पाञ ठरले–राजकिशोर मोदी

सिबीएसई अभ्यासक्रमाच्या 10 वी वर्गाच्या गुणवंतांचा सत्कार

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―सतत 9 वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेेचे माजी विद्यार्थी देश व परदेशात मोठ्या पदांवर काम करीत आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून शैक्षणिक क्षेत्रात संस्था व शाळेने ‘अंबाजोगाई पॅटर्न’ निर्माण केला आहे.न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी पाञ ठरले असल्याची माहिती संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी
यांनी दिली आहे.ते न्यु व्हिजन पब्लिक स्कूल येथे सिबीएसई अभ्यासक्रमाच्या 10 वी वर्गातील नुकतेच उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.

शहरालगत रिंगरोड नजीकच्या मोदी लर्निंग सेंटर येथे मंगळवार,दि.21 जुलै रोजी इयत्ता 10 वी परिक्षेत उज्ज्वल यश संपादन करणा-या न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.आय. खडकभावी,डॉ.विवेकानंद राजमाने,प्रा.प्रमोद कुलकर्णी,प्रा.सुरेश बिराजदार,श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण मोदी,कार्यकारी संचालक संकेत मोदी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी न्यु व्हिजन पब्लिक स्कुलच्या इयत्ता 10 वी वर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून,शाल,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर याप्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव राजकिशोर मोदी म्हणाले की,मुंबई,पुण्याच्या धर्तीवर अंबाजोगाई शहरात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या भुमिकेतून न्यू व्हिजन पब्लिक स्कुल ही शाळा सुरू करण्यात आली.शाळेचे शिक्षक हे उच्चविद्याविभूषीत आहेत.हे शिक्षक
आंध्रप्रदेश,कर्नाटक व केरळ येथील आहेत.गतवर्षी संस्थेचे सहा विद्यार्थी वैद्यकिय तसेच अनेक विद्यार्थी हे अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.नर्सरी,एल.के.जी,यू.के.जी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.संस्थेच्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत स्पर्धा परिक्षेसह इतर परिक्षेत ही विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहोत.येणारा काळ स्पर्धेेचा आहे.त्यामुळे न्यु व्हिजन पब्लिक स्कुलला मराठवाड्यातील सर्वोत्कृष्ट शाळा बनविण्याचा संकल्प केला असून पुढील काळात ते दिसून येईल.इयत्ता 10 वी व 12 वी तील गुणवंत विद्यार्थी यांनी अंबाजोगाईचे नांव यावर्षी ही उंचावले असल्याचे प्रतिपादन श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी यांनी केले.तर यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी यांनी सांगितले की,संकेत मोदी यांच्या रूपाने बालाजी शिक्षण प्रसारक मंडळात शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागणारे बदल होत आहेत.ही स्वागतार्ह बाब आहे.न्यु व्हिजनच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने महाराष्ट्रात अंबाजोगाईचे व संस्थेचे नांव उंचावले आहे.पालक व विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी लातूरला जाण्याची गरज नाही कारण,होरायझन अ‍ॅकॅडमी व न्यू व्हिजन पब्लिक स्कुलच्या माध्यमातून नांदेड,लातूर,पुणे येथे मिळणारे शिक्षण आता अंबाजोगाईतच मिळत आहे.विश्‍वास ठेवा.मुलांना जे हवे ते आम्ही देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू चिंता करू नका.पालकांनी आम्हाला भेटून बोलावे,आपल्या मौलिक सुचना कराव्यात त्यानुसार बदल केले जातील अशी ग्वाही प्राचार्य
डाॅ.खडकभावी यांनी दिली.डॉ.विवेकानंद राजमाने यांनी कोरोना लॉकडाऊन काळात ऑनलाइन शिक्षण सुविधा न्यू व्हिजन पब्लिक स्कुलने दिल्याचे सांगुन पालक विद्यार्थ्यांना शहराबाहेर पाठविण्यास तयार नाहीत.त्यामुळे आता अंबाजोगाई बाहेर जाण्याची आवश्यकता नाही.कारण,न्यू व्हिजन पब्लिक स्कुल व होरायझन अ‍ॅकॅडमी दर्जेदार शिक्षण देत आहेत असे प्रतिपादन डॉ.राजमाने यांनी केले.प्रा.सुरेश बिराजदार यांनी ही उपस्थित विद्यार्थ्यांना मौलिक संदेश दिला.तर संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,शिक्षणाबरोबर मानसिक व शारिरीक स्वास्थ्य सुधारण्यासाठी पुढील काळात संस्था विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.मेडीटेशन व खेळातून विद्यार्थ्यांचा मानसिक थकवा दुर करून पुन्हा नव्याने अभ्यासा करिता त्यांना तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती संकेत मोदी यांनी दिली.सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार विनायक मुंजे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *