केज तालुकासामाजिक

उंटावरून प्रवास करीत गावोगाव भटंकती करीत आंबेडकरी शाहीरीतुन समाज प्रबोधन करणारे गौर वाघोलीचे काकडे कुटुंब


केज दि.२६: जिथं माणसाला जगण्याची मारामार अशा परिस्थितीत सहा सात उंटांचा सांभाळ आणि या गावाहुन त्या गावाला कुटुंब-कबिल्यासह प्रवास करीत भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गीतातून गाणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील काकडे कुटुंब म्हणजे आंबेडकरी विचारांचा एक धगधगता निखराच आहे.

पूवी उपरक्षित समाजात शिक्षणाचे प्रमाण हे नगण्य असताना आणि खूप तोकड्या प्रमाणात प्रसिद्धी माध्यमे असताताना बाबासाहेबांचे विचार आणि चळवळ वाडी-वस्ती पर्यंत पोहोचविण्याचे काम केले ते आंबेडकरी जलसे आणि लोकलावंतांनी. त्या काळात डोक्यावर पेटी, तबला आणि ढोलकी घेऊन पायपीट करीत टेंभा किंवा मशालीच्या मिणमिणत्या प्रकाशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गौतम बुद्ध यांचे विचार आणि चळवळी बरोबरच अंधश्रद्धेवर गीतातून समाजप्रबोधन करणाऱ्या आंबेडकरी गायन पार्ट्या काळाच्या ओघात इतिहासजमा झाल्या. त्यांची जागा आता व्यावसायिक ऑर्केस्ट्रा आणि गायकी करणाऱ्या व्यवसायिकतेने घेतली आहे.
परंतु आणखी सुद्दा उंटावरून प्रवास करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील गौर-वाघोलीचे संपूर्ण काकडे कुटुंब हे उंटावरून भटंकती करीत आहेत. या कुटुंबात सुभाष काकडे, धर्माजी काकडे, रुतिक काकडे, किरण काकडे, किशोर काकडे हे
त्यांच्या सोबत पूर्वी पासून सहा ते सात उंट आहेत. ते उंटावरून महाराष्ट्राच्या अनेक भागात जातात. आज दुष्काळी परिस्थिती असताना एवढे मोठे उंट आणि त्यांची चारा पाण्याची व्यवस्था कशी करावी याची चिंता त्यांना सतावीत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील गौर-वाघोलीचे हे सुभाष काकडे, त्यांचा भाऊ आणि मुलगा किशोर हे फक्त बौद्ध वस्ती मध्येच कार्यक्रम करतात आणि जे धम्मदान मिळेल त्यावर गुजराण करतात. वेगवेगळ्या शाहिरांची व गायकांनी गायलेले गीत आणि स्वतंत्र चालीच्या रचना ते अगदी खड्या आवाजात गातात. तसेच सकाळी घरोघरी फिरून व प्रत्येक घरी जाऊन बाबासाहेब, गौतम बुद्ध यांची क्रांती गीते गाऊन चैतन्य निर्मान करतात आणि अंधश्रद्धेवर सडकून टीका करीत समाज प्रबोधन करतात.

आजही मिळेल त्या पैशावर अगदी पंधरा वीस रु वर सुद्दा समाधान मानून बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करतात.

  • "आंबेडकरी समाज आता सुशिक्षित झाला मात्र काहीजण समाजाकडे वळून पहात नाहीत आणि उपेक्षित आंबेडकरी लोककलावंतांची कदर करीत नाहीत याचे दुःख वाटते. मात्र मी माझे कार्य शेवट पर्यंत सोडणार नाही. मी बाबांचे गीत गातच राहणार."

सुभाष काकडे

  • "जनावरांच्या जशा छावण्या सुरू करून चारा पाण्याची सोय होईल तशी आमच्या उंटाला पण चारा पाण्याची सोय करावी ते आमचे पशुधन आहे."

किशोर काकडे


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.