गोंदिया दि.२४:राहुल उके― श्री मंगेश शिंदे, पोलीस अधिक्षक, गोंदिया यांचे संकल्पनेतुन पोस्टे देवरी अंतर्गत मौजा खडकी व खडकीटोला येथे नक्षलविरोधी रॅलीचे आयोजन.
माओवादी संंघटनेचा प्रमुख नेता चारु मजुमदार यांच्या स्मरनार्थ सीपीआय (माओवादी ) संघटनेकडुन दिनांक 28 जुलै ते 03 ऑगष्ट 2020 पर्यंत नक्षलवादी शहीद सप्ताह पाळत असतात.
नक्षल शहीद सप्ताह-2020 चे पार्श्वभुमीवर पोलीसांकडुन व इतर शासकीय विभागाकडुन विविध सार्वजनिक हिताचे कार्यक्रम राबविण्यात येतात. जेणेकरुन शासकीय यंत्रणेबाबत नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेत विश्वासाची भावना निर्माण व्हावी म्हणुन गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे श्री मंगेश शिंदे , पोलीस अधिक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 20 जुलै ते दिनांक 26 जुलै पर्यंत “नक्षल दमन विरोधी सप्ताह” राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने दिनांक 23 जुलै 2020 रोजी ग्रामपंचायत खडकी अंतर्गत मौजा खडकी व खडकीटोला येथे पोलीस निरीक्षक श्री दसुरकर प्रभारी अधिकारी उपमुख्यालय देवरी सपोनि अजित कदम ठाणेदार देवरी यांचे प्रमुख उपस्थितीत विशेष कृती दल देवरी, पोउपमु देवरी तसेच पोलीस स्टेशन चे कर्म सह “नक्षल दमन विरोधी सप्ताह” रॅली काढण्यात आली.