केज तालुकासामाजिक

आता बुद्धष्टीच्या प्रवेशद्वारावर उभारली जातेय सांचीच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती

केज दि.२६ :बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर त्रिवेणिताई कसबे यांनी स्वतःच्या कमाईच्या पैशातून भव्य बुद्ध मूर्ती स्थापन करून बुद्धसृष्टी उभी केली आहे. या परिसराला बुद्धसृष्टी अशी ओळख निर्माण केली आहे. त्याच बुद्ध सृष्टीतील महात्मा गौतम बुद्धाच्या मूर्ती समोर आता भव्य दिव्य स्वरूपात सांचीच्या स्तूपा समोरील असलेल्या कमानीची प्रतिकृती उभारली जात आहे.

बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर व मांजरा नदीच्या किनाऱ्या लगत केज-कळंब महामार्गावर केज तालुक्यातील तेलेवस्ती जवळ त्रिवेणिताई कसबे यांनी स्वतःच्या एक एकर जमिनीत आणि स्वतःच्या सेवनिवृत्तीच्या पैशातून पाच लाख रु. ची पंचधातूंची पद्मासनातील बुद्ध मूर्ती उभारून लॉन व सुंदर फुलांची झाडे आणि बुद्ध गयेतील बोध्दीवृक्षाचे रोपण केले असल्यामुळे हा बुद्ध सृष्टीचा परिसर शांत व नयनरम्य बनला आहे.
आता प्रवेशद्वारावर मध्यप्रदेशात सम्राट अशोक यांनी उभारलेल्या सांचीच्या स्तूपाच्या समोर असलेल्या कमानीच्या सुमारे साडे पाच मीटर उंच आणि तीन मीटर रुंदीची कमानीच्या काम सुरू आहे. या कमानीवर वरच्या मध्यभागी अशोक चक्र आणि बाजूला सिंह व हत्ती साकारले जात आहेत. या प्रवेशद्वाराचे काम स्थानिक कारागीर अमोल गरड यांनी केले आहे. आता पर्यंत याला दीड लाख रु. खर्च आला असून त्या पैकी पंचाहत्तर हजार रु. हे धम्मदान म्हणून जमा झाले आहेत आणि इतर अर्धा खर्च स्वतः त्रिवेणिताई यांनीच केलेला असून या प्रवेशदकाराच्या उर्वरित कामासाठी व रंगरांगोटीसाठी एक लाख रु. खर्च अपेक्षित आहे.
उर्वरित कला कलाकुसर व रंगकाम हे नांदेड जिल्ह्यातील कारागिरकडून घेण्याचा विचार आहे.
तसेच बुद्धसृष्टीत विपश्यना केंद्र सुरू करण्यासाठी त्याच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे.
आता पर्यंत बुद्धसृष्टीच्या उभारणीसाठी त्रिवेणिताई यांनी स्वतःच्या जमिनीसह सुमारे पन्नास लाख रु. खर्च केले आहेत. बुद्धसृष्टी आणि त्याच्या विकासासाठी समाजातील विविध स्तरातून मदत आणि त्याच बरोबर शासिकय मदत देखील मिळणे आवश्यक आहे.

बुद्धसृष्टीत उभारली जाणारे प्रवेशद्वार हे सांची येथील प्रतिकृती असून दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी समोर असेच प्रवेशद्वार आहे. म्हणून मी असे प्रवेशद्वार बुद्धसृष्टीत उभे करण्याचे ठरविले.
त्रिवेणिताई कसबे

(बुद्धसृष्टी निर्मात्या)

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.