बीड दि.१०:आठवडा विशेष टीम― प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत लाभार्थीना एप्रील, मे व जुन 2020 या तीन महिन्यांसाठी तीन गॅस सिलेंडरसाठी अनुदान त्याच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. तथापी काही नागरीकांचे खाते क्रमांक चूकीचे असल्यामुळे, तसेच खाते क्रमांक डिअॅक्टीव झाल्यामुळे संबधीत गॅस वितरण कंपनी यांना अनुदान जमा करता येत नाही.
ज्यांचे अनुदान जमा झाले नाही त्या जिल्हातील सर्व प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत लाभार्थी नागरीकांनी आपले सध्या कार्यरत असलेले अथवा नवीन बँक खाते नंबर दयावा अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजने अंतर्गत कनेक्शन असलेले व अद्याप अनुदान प्राप्त झाले नाही, असे सर्व गॅसधारक यांनी आपण ज्या ठिकाणाहून गॅस कनेक्शन घेतले आहे त्या गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा.
सदर ठिकाणी दिलेल्या यादीमध्ये जर आपले
नाव असेल तर आपण आधार नंबर लिंक असलेले व सध्या कार्यरत असलेले नवीन बँक खाते नंबर दयावा. जर बँक खाते नंबर उपलब्ध नसेल, तर अशा नागरिकांनी आपल्या नजीकच्या पोस्टमन यांच्याशी संपर्क साधावा व आपले पोस्ट बॅक खाते उघडावे. सदर पोस्ट बॅक खाते नंबर आपले गॅस एजन्सीधारक याच्याकडे जमा करावे. नागरीकांनी पोस्ट कार्यालयात बँक खाते उघडण्यासाठी जाताना त्याच्या जवळ आधार क्रमांक व मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
0