सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
जरंडी(ता.सोयगाव)येथील कोविड केंद्रासाठी १६ तालुकास्तरीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना रुग्णांच्या देखभालीसाठी आदेशित करण्यात आले असून एका दिवसात एका अधिकाऱ्याने कोविड केंद्रावर जावून रुग्णांच्या तब्बेतीची देखभाल आणि व्यवस्थेची आढावा घेण्याचे आदेशात म्हटले आहे.तहसीलदार प्रवीण पांडे यांनी या अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे.
सोयगाव तालुक्यात रुग्ण संख्येचा दुहेरी आकडा गाठला आहे.हि प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली असून या दुहेरी आकडा गाठलेल्या दहा रुग्णांना जरंडी कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या रुग्णांची देखभाल आणि व्यवस्थेची काळजी घेण्यासाठी तालुक्यावरील १६ अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले असून या अधिकाऱ्यांनी एकदिवस कोविड केंद्रावर भेटी देवून कोवीड केंद्राचीनियमित स्वच्छता राखून,त्यांच्या जेवणाची,चहा,नाष्टा,आदि बाबींची पूर्तता करून त्यांची आरोग्य तपासणीकडे लक्ष द्यावें असे आदेशात म्हटले आहे.राहुल सपकाळ,अनिल मिसाळ,अरविंद टाकणकर,पी.जे खडेकर,चंडोल,सुनील राठोड,आर.आर निसाळ,तोरनेकर,शकील पठान,यतीन कोठावळे,दिलीप जैस्वाल,डी.एम कोठावळे,विजय दुतोंडे,आर.डी फुसे,डॉ.महाजन आदि अधिकाऱ्यांना तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
0