दोन-दोन वर्षांपासून प्रलंबित असणारी शिष्यवृत्ती तात्काळ वितरित करा – पंकज बाहेगव्हाणकर

प्रतिनिधी | बीड : मराठवाडा आणि विशेषकरून बीड जिल्हा सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीने होरपळून निघाला आहे. त्यातच भटक्या जमाती – ड प्रवर्गातील विविध विभागात शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना 2017 पासून शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. सचिन बडे या विधिज्ञ तरुणाकडून दि. 25 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या माहिती अधिकार अर्जात शैक्षणिक वर्ष 2017 पासून भ ज (ड) प्रवर्गातील विद्यार्थ्यांची जवळपास अडीच कोटी रुपये इतकी शिष्यवृत्ती निधीच्या तरतुदीअभावी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान आज (दि. 26 फेब्रु.) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे सदर लाभार्थी विद्यार्थ्याना तात्काळ शिष्यवृत्ती वितरित करण्याबाबत कारवाई करण्यात यावी अशी अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने युवा नेते संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात व्यापक आंदोलन उभे करण्यात येईल अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चे बीड जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज बाहेगव्हाणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश तांदळे, नंदकुमार कुटे, ऍड सचिन बडे, अक्षय तिडके, प्रमोद मिसाळ, विकास सांगळे, प्रेमचंद ढाकणे, उत्तरेश्वर यादव, अभिषेक कदम, मारुती मुंडे, महेश मुंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *