अंबाजोगाई तालुकाखेळ

अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.२६ : अंबाजोगाई शहरातील युवा बॅडमिंटनपटु अक्षय प्रभाकर राऊतला राज्य शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार तसेच वार्ता समुहाचा नगरभुषण पुरस्कार नवनाथ घाडगे यांना तर युवा गौरव पुरस्कार डॉ.आनंद देशपांडे यांना तसेच अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेला सद्भावना पुरस्कार मिळाल्याबद्दल अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने या गुणीजनांचा सन्मान सोमवारी,दि.25 फेब्रुवारी रोजी करण्यात आला.

नगर परिषदेच्या वतीने राजकिशोर मोदी यांनी युवा बॅडमिंटनपटु अक्षय प्रभाकर राऊतला राज्य शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच वार्ता समुहाचा नगरभुषण हा पुरस्कार नवनाथ घाडगे यांना,युवा गौरव पुरस्कार डॉ.आनंद देशपांडे यांना तर अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेला सद्भावना पुरस्कार मिळाल्याबद्दल अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शेख उमर फारूख यांचा फेटा बांधून शाल,पुष्पगुच्छ देवून हृद्य सत्कार केला.
या छोटेखानी सत्कार सोहळ्याला काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक धम्मा सरवदे,राजीव गांधी पंचायत राज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शेख उमर फारूख,उपाध्यक्ष शेख तालेब चाऊस,संचालक शेख मुजाहेद, व्यवस्थापक सय्यद रऊफ जहागीर,प्रभाकर राऊत यांच्या सहीत मान्यवरांची उपस्थिती होती.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.