अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हासामाजिक

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथजी तिवारी यांचा राजकिशोर मोदी यांनी केला हृद्य सत्कार

प्रा.रंगनाथजी तिवारी यांना जाहीर झाला ‘महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार'

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.२६ :राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य आकादमीच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार 2017-18 हा प्रख्यात साहित्यिक व अंबाजोगाईचे भूषण असलेले प्रा.रंगनाथजी तिवारी यांना नुकताच जाहिर झाला आहे. त्याबद्दल बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी तिवारी यांचा त्यांच्या निवासस्थानी जावून मंगळवार,दि.26 फेब्रुवारी रोजी हृद्य सत्कार केला.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक सुनिल व्यवहारे,माजी नगरसेवक गणेश मसणे,माजी नगरसेवक सुनिल वाघाळकर, राजीव गांधी पंचायत राज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.या प्रसंगी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी प्रा.रंगनाथजी तिवारी यांचा फेटा बांधून शाल व पुष्पगुच्छ देवून हृद्य सत्कार केला.यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना राजकिशोर मोदी म्हणाले की,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथजी तिवारी सरांना राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मिळाला आहे. यापुर्वी ही त्यांना विविध मान सन्मान,पुरस्कार मिळालेले आहेत. प्रा.तिवारी सरांचे कार्य हे साहित्य क्षेत्रात अतिशय मोलाचे असून त्यांनी हिंदी भाषिक साहित्यासाठी दिलेली लेखनसेवा ही अत्यंत मौलिक व उल्लेखनिय आहे. त्यांच्यामुळे अंबाजोगाई शहर हे साहित्य क्षेत्रात ओळखले जाते.तिवारी सरांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे प्रा.तिवारी कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला व मोदी परिवाराला मनस्वी आनंद होत आहे.सरांना निरोगी दिर्घायु लाभो व सरांच्या हातून यापुढेही आधिकाअधिक साहित्य सेवा घडावी अशी अपेक्षा याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. सत्काराबद्दल तिवारी यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले व उपस्थित आशिर्वाद दिले.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.