-
अंबाजोगाईकरांनी लघुपट पहावा-नगरपरिषदेच्या ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन समितीचे आवाहन
अंंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.२६:अंबाजोगाईच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख सर्वदूर व्हावी,या उद्देशाने गेल्या साडेचार वर्षांपासून ‘मनोहर अंबानगरी’ हा प्रकल्प सुरु आहे.‘मनोहर अंबानगरी’ वरती एक लघुपट (shortfilm) तयार केला आहे.तो आता अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये गाजत आहे.या लघुपटाचा (शॉर्ट फिल्मचा) प्रिमिअर शो
अंबाजोगाईकरांना रविवार,दि.3 मार्च रोजी लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.तरी सदर लघुपटाचा (शॉर्ट फिल्मचा) प्रिमिअर शो पाहण्याचा लाभ अंबाजोगाईकरांनी घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेने स्थापन केलेल्या ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
अंबाजोगाई शहर हे देश – विदेशात फिल्मच्या माध्यमातून पहिले जात आहे.‘मनोहर अंबानगरी’ हा लघुपटाला ‘इको फिल्म फेस्टिवल ब्रिक्स’ च्या माध्यमातून ‘मॉस्को,रशिया’(Moscow, Russia) येथे दाखवण्यात आला. त्यानंतर या लघुपट गतवर्षीच्या ‘कंबोडिया’ (Cambodia)’ येथे झालेल्या ‘एशिया साऊथ ईस्ट फिल्म फेस्टिवल’ (-sia South East Short film Festival) चा ‘ऑनरेबल अवॉर्ड’(HONOUR-BLE MENTION) मिळाला आहे.संस्कृती, इतिहास आणि पुरातात्विकदृष्ट्या अंबाजोगाईचे महत्व प्रचंड आहे.त्याच अंबाजोगाईची दखल आता ‘द-आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ (The -rchaeology Channel International Film Festival) ने घेतली आहे.‘मनोहर अंबानगरी’ फिल्म अमेरिकेतही दाखवण्यात आली.‘द- आरकॉलॉजी चॅनेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ मधील कला, संस्कृती आणि इतिहास या विभागात 45 देशांमधील 800 फिल्ममधून 30 फिल्म या फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आल्या. अमिरेकीतील ‘ओरेगन’ राज्यातील प्रमुख शहर ‘युजीन’ (Eugene, Oregon) या ठिकाणी हा फेस्टिवल गतवर्षी 2 ते 6 मे 2018 या कालावधीत संपन्न झाला.असा या लघुपटाचा प्रवास सुखावणारा आहे.हाच लघुपट आता रविवार,दिनांक 3 मार्च 2019 ला सायंकाळी 5.30 वाजता अंबाजोगाईकरांना पहाता येणार आहे. अंबानगरीच्या वैभवाची ओळख करून देणारी ‘मनोहर अंबानगरी’ हि शॉर्ट फिल्म 17 मिनीटे कालावधीचा असून लघुपटात एकुण 45 महत्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती आहेत. तब्बल साडेचार वर्षांचा कालावधी हा लघुपट बनविण्यासाठी लागला आहे.जगाच्या पाठीवर अंबाजोगाईचे स्थान निश्चित करणारा हा लघुपट आहे.या लघुपटातून अंबाजोगाईचा सांस्कृतिक,ऐतिहासिक,नैसर्गिक असा समृध्द वारसा जगाला पाहण्यासाठी उपलब्ध झाला आहे.हा लघुपट बनविण्यासाठी अंबाजोगाई मधील अनेकांचे सहकार्य लाभले आहे.राहुल नरवणे,राधेश कुलकर्णी, मानसी खटी यांनी तयार केलेल्या लघुपटाच्या टिम मध्ये विश्वास कुलकर्णी,दत्ता अंकुशे, स्वप्नील जोशी,राहुल पोतदार यांचा समावेश आहे.तरी अंबाजोगाईतील नागरीकांनी या लघुपटाचा (शॉर्ट फिल्म)प्रिमिअर शो पहावा असे आवाहन नगरपरिषदेच्या ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन समितीच्या अध्यक्ष तथा नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,सचिव तथा नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,सदस्य तथा उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,इतिहास संशोधक प्रा.शदरराव हेबाळकर, नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुरेश कराड, नगरसेवक दिनेश भराडीया,राधेश कुलकर्णी,जितेंद्र देशपांडे,आकाश कराड, नामदेव गुंडाळे, दत्तप्रसाद गोस्वामी, नगररचनाकार, अभिरक्षक पुरातत्व विभाग सल्लागार सदस्य तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेवक हनुमंत तौर,रत्नाकर निकम यांच्या वतीने करण्यात येत आहे.