सोयगाव,दि.१९:आठवडा विशेष टीम―
ग्रामीण भागात कोविड-१९ पाय पसरवित असतांना यावर तातडीच्या उपाय योजनांमध्ये ग्रामीण भागात विना परवानगी येणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे सूचना देण्याचे आदेश मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ,मंगेश गोंदावले यांनी काढले आहेत.जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांना हे आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोविड-१९ पाय फैलावत आहे.त्यामुळे ग्रामीण भाग नियंत्रणात आणणे अवघड जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली असतांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विना परवाना जिल्हा हद्द ओलांडून येणाऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे थेट फर्मान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढल्याने बुधवार पासूनच या आदेशाचे पालन करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सोयगाव सुरक्षित-
कोविड-१९ च्या बाबतीत चौथ्या लॉकडाऊन मध्येही सोयगाव तालुका अद्यापही सुरक्षित असून सोयगाव तालुक्यात अद्यापही एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही.महसूल,पंचायत समिती आणि आरोग्य विभागाने उपाय योजनांची रेलचेल केल्याने सोयगाव सुरक्षित राहिला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच पळाशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका कल्पना कचरे यांनी आदेशाची तातडीने अंमलबजावणी केली आहे.गावाच्या प्रवेशद्वारावर ग्रामपंचायतीच्या वतीने दोन कोरोना रक्षक उभे करण्यात आले असून गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नावांच्या नोंदी घेवूनच परवानगी असल्यासच त्यांना पळाशी गावात प्रवेश देण्यात येत आहे.त्यामुळे आता पळाशी गावात प्रवेश करावयाचा असल्यास परवानगी घेवूनच या असा फर्मानच काढण्यात आला आहे.