डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण,रेवदंडा व नगरपरिषद अंबाजोगाई यांचा संयुक्त पुढाकार
महास्वच्छता अभियानात अंबाजोगाईकरांनी सहभाग नोंदवावा―नगरपरिषदेचे विनम्र आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.२७ :डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण, रेवदंडा व नगरपरिषद, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई शहरात रविवार,दि.3 मार्च रोजी सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात अंबाजोगाई शहरातील नागरिक,स्वयंसेवी,
सहकारी संस्था, सामाजिक व खाजगी प्रतिष्ठाणे,धार्मिक संस्था, रोटरी क्लब,शैक्षणिक संस्था,बँका,पतसंस्था, बचतगट,स्वयंसेवक आदींसहीत नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक,कर्मचारी तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण, रेवदंडा यांचे सुमारे दहा
ते बारा हजार सदस्य हे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.तरी अंबाजोगाईकरांनी हे महास्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी स्वता: आपलाही महत्वपुर्ण व सक्रिय सहभाग नोंदवावा असे विनम्र आवाहन अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,पालिकेचे सर्व सभापती,नगरसेवक,
नगरसेविका,
मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप, गटनेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आदींनी केले आहे.
सहभाग नोंदवून महास्वच्छता अभियान यशस्वि करा-राजकिशोर मोदी
अंबाजोगाई हे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक व आग्रेसर असणारे शहर आहे. यापुर्वीही सातत्याने अंबाजोगाई शहरात सार्वजनिक परिसरांची स्वच्छता विविध माध्यमातून करण्यासाठी अंबाजोगाईकर नागरीक व नगरपरिषद प्रशासन हे दक्ष व कटीबद्ध राहिले आहे.डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण,रेवदंडा यांच्या वतीने नगरपरिषदेस महास्वच्छता अभियान राबविण्याबाबत यापुर्वी चर्चा झाली होती. मंगळवार,दि.26 फेब्रुवारी रोजी महास्वच्छता अभियान आयोजनाबाबत प्रतिष्ठाणच्या सदस्यांशी सकारात्मक चर्चा होवून त्या चर्चेनंतर रविवार,दि. 3 मार्च रोजी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण,रेवदंडा आणि नगरपरिषद अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने या महास्वच्छता अभियान राबविण्याचे ठरले.त्यानुसार महास्वच्छता अभियानात अंबाजोगाई शहरातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक प्रतिष्ठाणे, धार्मिक संस्था,रोटरी क्लब,शैक्षणिक,
सहकारी संस्था,बँका, पतसंस्था,बचतगट, स्वयंसेवक,सर्व शासकिय कार्यालये आदींसहीत नगर परिषदेचे सर्व नगरसेवक,नगरसेविका कर्मचारी तसेच संपुर्ण महाराष्ट्रातून डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण, रेवदंडा यांचे सुमारे दहा
ते बारा हजार सदस्य हे मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.या कामी अंबाजोगाईकर नागरिकांचे,सामाजिक तसेच खासगी प्रतिष्ठाणे यांचे सहकार्य लाभणार आहे.अंबाजोगाईला स्वच्छतेच्या बाबतीत आग्रेसर ठेवण्यासाठी व जनतेत परिसर स्वच्छतेचा संदेश जाण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे तरी अंबाजोगाईतील जनतेने,स्वयंसेवी,
सामाजिक संस्थांनी या महास्वच्छता अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.