कुंभार काम मातीकला यंञ वितरण जिल्हा अधिकारी सौ. दिपा मुधोळ – मुंढे यांच्या हस्ते , अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वितरण समारंभ संपन्न

उस्मानाबाद (प्रतिनिधी) दि.२७:आज उस्मानाबाद येथे खरेदी खादी व ग्रामोद्योग आयोग आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार काम मातीकला यंञ वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या यंत्राचे कुंभार समाजातील शंभर बांधवांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते.

या कार्यक्रमास लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य श्री महेंद्र काका धुरगुडे यांनी उपस्थित राहुन उपस्थितांना संबोधित करताना या यंत्रणा पासून वंचित राहिलेल्या कुंभार बांधवांनी दुःखी न होता , त्यांच्या साठी देखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत निवेदन देऊन लवकरात लवकर कुंभार काम मातीकला यंञ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी कुंभार संघटनेचे पदाधिकारी व कुंभार समाजातील बांधव – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *